महाराष्ट्र

अखेर मंत्रिमंडळ विस्तार होणार! भावी मंत्र्यांची नावेही समोर?

अखेर मंत्रिमंडळ विस्तार होणार! भावी मंत्र्यांची नावेही समोर ?

जळगाव (प्रतिनिधी)-सत्ता संघर्षाच्या या पेच मध्ये आता लवकरच मंत्री मंडळ विस्तार होणार असून अनेकांना आता मंत्री होण्याचे डोहाळे हि लागणार तर काहीना रात्रीचे दिवा स्वप्न हि येणार कि मी आता मंत्री झालो . परंतु  असो   जिल्ह्यातील पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात असून , सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना लागले आहे. तर न्यायालयाच्या निकालाने शिंदे- फडणवीस सरकारला अभय मिळाल्यानंतर आत्ता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर आली असून मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेसह संभाव्य मंत्र्यांची नावेही समोर येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे शिंदे- फडणवीस सरकारकडून सांगण्यात येत होते. ज्याची आता तारीखही समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे रखडलेल्या मंत्रि मंडळाचा विस्तार हा २३ किंवा २४ मे ला घेण्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगवले( जलसंधारण मंत्री), संजय शिरसाठ (परिवहन किंवा समाज कल्याण) बच्चू कडू (दिव्यांग मंत्री)प्रताप सरनाईक , सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर, चिमणराव पाटील या आमदारांची वर्णी लागण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याचे बोलले जात आहे, दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत सर्व मिळून 50 आमदार आल्याने प्रत्येकालाच महत्त्वाकांक्षा, मंत्रीपदाची अपेक्षा होती व आहे . मात्र पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांचा अपेक्षाभंग झाला. काहींनी जाहीर नाराजीही व्यक्त असून . यात संजय शिरसाट तसेच बच्चू कडू यांचाही समावेश आहे. आता २८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे आता कोणा कोणाची वर्णी लागणार हे पाहणे औस्थूक्याचे  ठरणार आहे.  मंत्री मंडळ विस्तार लवकरच होणार कि यातही काही फाटे फुटणार ही येणारा वेळच  सांगेल.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button