
राजकीय दबावात सुनावणी आटोपती घेणाऱ्या जिल्हा उपनिबंधकांचा निषेध- वैशाली सुर्यवंशी
पाचोरा (प्रतिनिधी)- पाचोरा कृषी बाजार समितीची नुकतीच निवडणुक पार पडली. या निवडणुकीच्या निकालाच्या वेळी जागांच्या बाबतीत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी सदोष व राजकीय दबावात कामकाज केले असल्याचा त्यांच्यावर आरोप झाला तर विद्यमान आमदारांच्या पॅनलला सहाय्य करीत काही निकाल जाहीर केले. त्याच्या विरोधात मा. जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे इलेक्शन पिटीशन दाखल केलेले आहे. असे असताना देखील जिल्हा तडकाफळकी आमच्या पॅनलचे उमेदवार उध्दव मराठे यांना अपात्र घोषीत करण्यासाठी सलगच्या व जवळच्या तारखा देऊन पक्षपात करीत आहेत.तसेच अपात्रता अर्जावर पक्षाकारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा अवधी न देता घाईघाईत सलगच्या तारखा देऊन जिल्हा उपनिबंधक यानी आपली सत्ताधा-यांशी असलेली बांधीलकी जवळीक जगाला दाखवून दिलेली आहे. असे मत वैशाली सूर्यवंशी यांनी मांडले विशेष उपनिबंधकांनी त्यावर पक्षकारांना नोटीस देखील काढलेली नाही. मात्र आमदारांचे कार्यकत्यांनी दाखल केलेल्या अपात्रता प्रकरणात उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असतानाही नोटीस काढून नैसर्गिक न्यायतत्वाने न वागल्याने जळगाव जिल्हा सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक बिडवाई यांचा जाहीर निषेध आम्ही करीत आहोत. तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दाखल असलेल्या इतर तक्रारी व त्याचे चौकशीच्या प्रकरणात अद्याप चौकशी न प्रकरणे प्रलंबीत ठेवलेली आहेत. त्याची साधी चौकशी देखील केलेली नाही. अशा प्रकरणांच्या जिल्हा उपनिबंधक बिडवाई यांची चौकशी करण्याची देखील मागणी आम्ही करीत आहोत तसेच आम्ही लवकर जिल्हा उपनिबंधक याना घेराव घालण्यासाठी मोर्चा काढणार आहोत असेही वैशालीताई सूर्यवंशी यांनी बोलतांना सांगितले. एकूणच या सभापती व मार्केट सत्ता संघर्षच्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा पाचोरा शहरात चर्चेला उधाण आले आहे.



