सुमित किशोर पाटील यांचा माऊली ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार !

सुमित किशोर पाटील यांचा माऊली ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार !
जळगाव – आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोर पाटील यांची जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी माऊली ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने त्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या वतीने राजाराम नागो सोनार यांच्या हस्ते सुमित किशोर पाटील यांना शाल, पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन ज्येष्ठ नागरिक सभासद बंधू-भगिनींच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
या सत्कार समारंभाप्रसंगी माऊली ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव के. एस. महाजन, सहसचिव शांताराम चौधरी, उपाध्यक्ष युवराज भगवान महाजन, संचालक एम. एस. महाजन, छगन पाटील गुरुजी, संतोष पाटील, सी. एन. चौधरी, आनंदराव पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, संचालक व ज्येष्ठ नागरिक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमित किशोर पाटील यांच्या बिनविरोध निवडीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या या सन्मानामुळे कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.



