खान्देश

पाचोरा पालिकेच्या कारभाराची धुरा आता किशोर बारवकर यांच्या हाती!

एक महिन्यासाठी प्रभारी नगराध्यक्षपदाची जबाबदारी; आमदार किशोर पाटील यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षा सुनीता पाटील यांचा निर्णय !

न्यूज झेप इंडिया | पाचोरा

पाचोरा पालिकेच्या कारभाराची धुरा आता किशोर बारवकर यांच्या हाती!

एक महिन्यासाठी प्रभारी नगराध्यक्षपदाची जबाबदारी; आमदार किशोर  पाटील यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षा सुनीता पाटील यांचा निर्णय

पाचोरा | प्रतिनिधी

पाचोरा नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर यांच्याकडे एक महिन्यासाठी प्रभारी नगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नगराध्यक्षा सुनीता किशोर आप्पा पाटील यांनी कौटुंबिक कारणांमुळे पालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी वेळ देणे शक्य नसल्याने हा निर्णय घेतला. आमदार किशोर  पाटील यांच्या सूचनेनुसार व नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्या सहमतीने किशोर बारवकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीदरम्यान किशोर बारवकर यांची प्रभारी नगराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार नगराध्यक्षा सुनीता पाटील यांनी अधिकृत पत्राद्वारे एक महिन्याच्या कालावधीसाठी पालिकेचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे.

विकासकामांना गती, प्रशासनात सातत्य राखण्याचा प्रयत्न

पालिकेचा कारभार सुरळीत सुरू राहावा, नागरिकांची दैनंदिन कामे प्रलंबित राहू नयेत आणि शहरातील विकासकामांना खंड पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून किशोर बारवकर हे आगामी एक महिन्यात पालिकेच्या दैनंदिन कामकाजाची धुरा सांभाळणार आहेत.

शहरातील मूलभूत नागरी सुविधा, नागरिकांच्या समस्या, प्रलंबित कामे आणि विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने त्यांच्या कार्यकाळाकडे आता लक्ष लागले आहे. पालिकेच्या कामकाजात समन्वय राखून विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे.

सामान्य कार्यकर्त्याला नेतृत्वाची संधी!

आमदार किशोर आप्पा पाटील, नगराध्यक्षा सुनीता पाटील आणि गटनेते सुमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा पालिकेत सुरू असलेली विकासाची घोडदौड कायम ठेवण्याचा निर्धार प्रभारी नगराध्यक्ष किशोर बारवकर यांनी व्यक्त केला.

किशोर बारवकर म्हणाले :

“आमदार किशोर पाटील, नगराध्यक्षा सुनीता पाटील आणि गटनेते सुमित पाटील यांच्या नेतृत्वात पाचोरा पालिकेत सुरू असलेली विकासाची घोडदौड कायम राहणार आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास मी कामातून सार्थ करून दाखवणार आहे.”

 किशोर बारवकर, प्रभारी नगराध्यक्ष, पाचोरा

एक महिन्याच्या कालावधीत किशोर बारवकर यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा नगरपालिकेचा कारभार कसा राहतो आणि शहरातील विकासकामांना किती गती मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button