newszepindia
" जन सामान्यांचा बुलंद आवाज "

पाचोऱ्यात समाज कंटक युवकांना अटक .

- Advertisement -

पाचोरा (प्रतिनिधी ) सोशल मीडियावर आक्षेपाहार्य पोस्ट व्हायरल करणाऱ्या दोन तरुणांना पाचोरा पोलीसांनी अटक केली असून या तरुणांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल या भावनेने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल बद्दल शिवराळ भाषेचा वापर करून आक्षेपाहार्य पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती या संदर्भात हेंमत गुरव यांच्या फिर्यादीवरून सलीम खान व शारुख खान शेख दोन्हि राहाणार बाहेरपूर पाचोरा या तरुणांना पाचोरा पोलिसांनी भादंवि कलाम २९५ अ २९८ ,५०४ ६६ अ सायबर ऍंक्ट नुसार पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकाडे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे ,यांच्यासह पो कॉ राहुल बेहरे , किरण पाटील अमृत पाटील , प्रकाश पाटील प्रशांत चौधरी यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने बाहेर पुरा भागातून ताब्यात घेतले. तसंच बजरंग दलाचे अधिकारी हेमंत गुरव व पोलीस प्रशासनातर्फे शांततेचे आवाहन देखील करण्यात आले आहे .

- Advertisement -

- Advertisement -