सामाजिक

लोहारा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

लोहारा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
रामराज्य फाउंडेशन व माणुसकी रुग्णसेवा समूह यांचा संयुक्त उपक्रम
लोहारा तालुका पाचोरा येथील रामराज्य फाउंडेशन व माणुसकी रुग्णसेवा समूह यांच्यातर्फे पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी रा.स्व.संघ जनकल्याण समिती अंतर्गत जळगाव येथील माधवराव सदाशिवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढिने रक्त संकलित केले.सकाळी ८ वाजता पत्रकार, सामाजिक राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान सुरुवात करण्यात आली.
गावातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील रामराज्य फाउंडेशन व माणुसकी समूहाच्या 21 रक्तदात्यांनी रक्तदान करून या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली.
यावेळी माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष निस्वार्थ पद्धतीने अविरत सेवा करणारे तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी ५३ व्या वेळेस रक्तदान करून तरुण पिढीसमोर नवा आदर्श घालून दिला आहे.
यावेळी रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी रामराज्य फाउंडेशन व माणुसकी समूहाचे सदस्य संतोष कोळी, गुणवंत क्षीरसागर, चंद्रकांत गीते CRPF, एडवोकेट हेमंत गुरव,गजानन क्षीरसागर ,सागर कोळी, दीपक भील, ज्ञानेश्वर चौधरी, ईश्वर खरे, महेश पांढरे, राजेश पाटील, अशोक चौधरी, रवींद्र पांढरे, रवींद्र राजपूत, हुकुमचंद पाटील, सुनील राजपूत, सुरेश सोनवणे, केके कोळी, निलेश न्हावकर ,राजू कोळी,यांनी उपस्थित राहून आपले अनमोल रक्तदान दिले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button