खान्देश
*योजना पाटील यांनी केले शीत शवपेटीचे लोकार्पण*

*योजना पाटील यांनी केले शीत शवपेटीचे लोकार्पण*
भडगांव/पाचोरा *(प्रतिनिधी)* : ओझर-अंतुर्ली विकास सोसायटीत भडगांव शेतकरी संघाच्या संचालिका मंडळ अध्यक्षा मा. सभापती नगरसेविका योजना पाटील यांनी सामाजिक बांधिलकी माणुसकीची जाणीव जपत शीत शवपेटीचे सेवा संकल्प अभियान अंतर्गत लोकार्पण केले. सदर प्रसंगी माजी चेअरमन आनंदराव पाटील, संचालक डी. डी. पाटील, माजी नगरसेवक डॉ. भरत पाटील, मुख्याध्यापक सोमनाथ पाटील, प्रशांत पाटील, अशोकगीर गोसावी, सुनील पाटील, अजबराव पाटील, हेमराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भैय्या पाटील, सचिव प्रमोद पाटील सह उपस्थितीत मान्यवरांनी योजनाताई पाटील यांच्या सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.



