पाचोरा येथील तारा राणी क्रीडा संकुलाच्या महिला मल्लांचा जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत दणदणीत विजय; सर्वच्या सर्व ६ खेळाडू प्रथम!

पाचोरा येथील तारा राणी क्रीडा संकुलाच्या महिला मल्लांचा जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत दणदणीत विजय; सर्वच्या सर्व ६ खेळाडू प्रथम!
पाचोरा:(डॉ. योगेश पाटील) – चाळीसगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पाचोरा येथील तारा राणी महिला क्रीडा संकुल (नगरपालिका टाऊन हॉल) च्या महिला मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्धकांना चितपट करत सुवर्ण कामगिरी केली आहे. या स्पर्धेत क्रीडा संकुलाच्या सर्वच्या सर्व ६ महिला खेळाडूंनी आपापल्या वजन गटात प्रथम क्रमांक पटकावून पाचोरा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
विजयी खेळाडू आणि त्यांचे वजन गट:
* **शगुन संदीप पाटील** – ३९ किलो गट (प्रथम)
* **आरुषी संदीप पाटील** – ४३ किलो गट (प्रथम)
* **धनश्री बटू पाटील** – ४६ किलो गट (प्रथम)
* **तनुजा गंगाराम तेली** – ५५ किलो गट (प्रथम)
* **अक्षरा सुभाष बागुल** – ६२ किलो गट (प्रथम)
* **शर्वरी निलेश कुलकर्णी** – ६५ किलो गट (प्रथम)
या सर्व विजयी महिला मल्ल या वस्ताद दिनेश पैलवान (दिनेश पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून, त्यांच्या खडतर परिश्रम आणि अचूक तंत्राच्या जोरावरच खेळाडूंनी हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
या यशामागे तांत्रिक सचिव निलेश कुलकर्णी, बटू पैलवान, लखन पैलवान, महावीर व्यायाम शाळेचे अध्यक्ष राजेंद्र सुखदेव पाटील, कैलास आमले सर, एस. के. पाटील सर, एस. के. अण्णा पाटील, रवींद्र देवरे, अमोल पवार, मयूर शेलार, किशोरभाऊ भोई तसेच अमित शिवाजी पाटील या सर्वांचे बहुमूल्य योगदान व मार्गदर्शन लाभले.
महिला मल्लांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल वस्ताद दिनेश पाटील, सर्व विजयी खेळाडू आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मान्यवरांचे संपूर्ण पाचोरा शहरातून व मित्रपरिवाराकडून जोरदार कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. क्रीडा क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना उदंड शुभेच्छा देण्यात येत आहेत.



