क्राईम

गोराडखेडा परिसरातून डॉक्टर संजय तेली बेपत्ता!

गोराडखेडा परिसरातून डॉक्टर संजय तेली बेपत्ता!

गोराडखेडा गावाजवळ चारचाकी वाहन आढळले; पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पाचोरा, प्रतिनिधी :-  कन्नड येथे वास्तव्यास असलेले डॉक्टर संजय मनोहर तेली हे गोराडखेडा परिसरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून त्यांच्या कुटुंबीयांकडून शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री. धनलाल मनोहर तेली (सांगवी प्र. लो.) यांचे लहान बंधू डॉक्टर संजय मनोहर तेली यांनी गोराडखेडा येथे तब्बल एक कोटी एक लाख रुपये किमतीची शेतजमीन खरेदी केली होती. आज जमिनीच्या व्यवहारासंदर्भात दोन लाख रुपये देण्यासाठी ते कन्नड येथून गोराडखेडा येथे आले होते.

दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास त्यांनी शेवटचा फोन केला होता. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद येत असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान, त्यांची चारचाकी गाडी गोराडखेडा गावाजवळ आढळून आली आहे. मात्र, संजय तेली हे नेमके कुठे आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

या संदर्भात धनलाल मनोहर तेली यांनी किशोर आप्पा यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

**नागरिकांना आवाहन :** डॉक्टर संजय मनोहर तेली हे कोणाला दिसल्यास किंवा त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.

संपर्क : धनलाल मनोहर तेली – मो. 9011584373

संजय तेली यांचा लवकरात लवकर शोध लागावा, अशी अपेक्षा कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button