खान्देश

नांद्रा येथील श्री समर्थ कृषी गटाकडून सदस्यांना ४० हजार रुपयांचे बोनस वाटप

नांद्रा येथील श्री समर्थ कृषी गटाकडून सदस्यांना ४० हजार रुपयांचे बोनस वाटप

दुष्काळी परि स्थितीत शेतकरी सभासदांना आर्थिक आधार; गटाचे भागभांडवल १५ लाख ५० हजारांवर

कुरंगी, ता. पाचोरा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत नांद्रा येथे स्थापन झालेल्या श्री समर्थ ग्रामीण कृषी मंडळ शेतकरी गटाने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या सदस्यांना प्रत्येकी ४० हजार रुपये बोनस म्हणून वाटप केले. गटाच्या तेरा वर्षांच्या यशस्वी वाटचालीतून निर्माण झालेल्या आर्थिक बळकटीचे हे फलित मानले जात आहे.

श्री समर्थ ग्रामीण कृषी मंडळ शेतकरी गटाची स्थापना १ नोव्हेंबर २०१४ रोजी करण्यात आली. या गटात २० सातबारा धारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. सुरुवातीला प्रत्येक सभासदाने दरमहा १०० रुपये बचत करण्यास सुरुवात केली होती. कालांतराने ही बचत वाढवून आता दरमहा ५०० रुपये करण्यात आली आहे. नियमित बचत आणि आर्थिक शिस्तीच्या माध्यमातून गटाने यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.

१ नोव्हेंबर २०२६ रोजी गटाने तेरा वर्षे पूर्ण करून चौदाव्या वर्षात पदार्पण केले आहे. सध्या गटाचे एकूण भागभांडवल १५ लाख ५० हजार रुपये झाले आहे. यामध्ये गटाच्या स्वतःच्या बचतीचे ८ लाख २४ हजार रुपये असून, ७ लाख २६ हजार रुपये गटांतर्गत एक टक्का व्याजदराने सभासदांना वाटप करण्यात आलेले आहेत. सामूहिक बचत आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून गटाने आर्थिकदृष्ट्या भक्कम स्थिती निर्माण केली आहे.

याच पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर रोजी नांद्रा ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहाय्यक प्रतीक्षा पवार यांच्या उपस्थितीत गटाची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गटातील ज्येष्ठ शेतकरी नारायण शामराव पाटील होते. यावेळी दुष्काळी परिस्थितीचा विचार करून गटातील प्रत्येक शेतकरी सभासदाला ४० हजार रुपये बोनस म्हणून वितरित करण्यात आले.

या बैठकीला गटाचे अध्यक्ष सुरेश शामराव पाटील, उपाध्यक्ष माधवराव हिरामण पाटील, सचिव ओमप्रकाश युधिष्ठिर पवार, सदस्य एकनाथ पाटील, जिजाबाई पाटील, कोकीळा पवार, हेमलता सूर्यवंशी, प्रकाश पाटील, राजाराम कुंभार, भाऊराव तावडे, जयश्री पवार, राहुल पाटील, सुनील पाटील आदी सभासद उपस्थित होते.

सामूहिक बचतीतून आर्थिक स्वावलंबन

नियमित बचत, सभासदांमधील परस्पर विश्वास आणि गरजेच्या वेळी आर्थिक मदत या माध्यमातून श्री समर्थ कृषी गटाने ग्रामीण भागात आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केला आहे. दुष्काळी परिस्थितीत सभासदांना बोनसचे वाटप करून गटाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिला आहे.

कोट- माझ्या मुलीच्या लग्न कार्यासाठी मला पैशांची गरज असताना माझ्या या कृषी गटातून मी एक लाख रुपये एक टक्के प्रमाणे घेतले होते त्याची परतफेड नियमित करत असल्याने मला याचा मोठा फायदा झाला. राजाराम कुंभार नांद्रा

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button