Uncategorized

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त गुणगौरव सोहळा उत्साहात

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त गुणगौरव सोहळा उत्साहात

भडगाव प्रतिनिधी – संजय शेवाळे : राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त भडगाव तालुका व शहर शाखेच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसह समाजाच्या हितासाठी आणि हक्क व न्यायासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गुणगौरव व सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, समाजभूषण पांडुरंग बाविस्कर, भडगाव तालुकाध्यक्ष रवीभाऊ अहिरे, युवा शहराध्यक्ष सुधीरभाऊ अहिरे, युवा तालुका उपाध्यक्ष मधुकर वाघ, तालुका संघटक पत्रकार संजय शेवाळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लता ताई अहिरे, सभापती हिरामण पाटोळे, माजी जिल्हाध्यक्ष **उत्तम दौलत मोरे, जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, सुरेखाताई वाघ, दिलीप वाघआदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेल्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

समाजाच्या समस्या, हक्क व न्यायासाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या पत्रकारांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. पत्रकार डॉ. डी. बी. भोसले, हर्षल चौधरी, निलेश महाले, सागर महाजन तसेच व्हॉईस ऑफ मीडियाचे शहराध्यक्ष संजीव शेवाळे** यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश टाक, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे  यांच्यासह समाजबांधव, विद्यार्थी, पालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिक्षण, सामाजिक एकजूट आणि समाजाच्या प्रगतीचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय शेवाळे यांनी केले, तर प्रा. तांदळे यांनी आभार मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button