अन्यआरोग्यकृषीक्राईमक्रीडाखान्देशजळगांव जिल्हाताज्या बातम्यादेश विदेशनोकरी - व्यवसायपाचोरामहाराष्ट्र

ॲड.अविनाश सुतार यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड माजी आमदार दिलीप वाघ यांचे हस्ते सत्कार

ॲड.अविनाश सुतार यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड
माजी आमदार दिलीप वाघ यांचे हस्ते सत्कार
पाचोरा-पाचोरा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज घोषणा करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे ॲड.अविनाश देविदास सुतार सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
उपनगराध्यक्ष यांचेसह स्वीकृत सदस्यांची आज झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. यावेळी बैठकीला नगराध्यक्षांसह नगरपरिषदेतील भाजपाचे गटनेते सुरज वाघ, नगरसेविका कविता पाटील, नगरसेविका कविता हटकर, नगरसेविका अमरीन देशमुख, नगरसेवक राहुल गायकवाड,नगरसेवक गोपाल वासवाणी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
ॲड.अविनाश सुतार यांच्या या नियुक्ती बद्दल माजी आमदार दिलीप वाघ यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अमोल शिंदे,माजी गटनेते संजय वाघ,, दीपक माने, शिवदास पाटील, समाधान मुळे, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, भूषण वाघ,जगदीश पाटील, भैय्या ठाकूर, योगेश पाटील, ललित सुतार, प्रवीण पाटील,आकाश लांडगे, रावजी बावचे,बंटी महाजन,अनिल पाटील ,सतीश चौधरी, विनोद पाटील, टिपू देशमुख,बंटी हटकर,निलेश पाटील, चंद्रकांत चौधरी, गणेश पाटील, बंटी पाटील, संजू भोई, अनिल धना पाटील,खुशाल कुंभार, राकेश महाजन, दामू पाटील, लकी पाटील, सोमनाथ महाजन,अनिल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या या नियुक्ती बद्दल नामदार गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण भाजपाचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, भाजपा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button