पाचोऱ्यात घरात पाय घसरून पडल्याने ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू*
*पाचोऱ्यात घरात पाय घसरून पडल्याने ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू*
**पाचोरा | प्रतिनिधी**
पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरात घरात बाथरूमकडे जात असताना पाय घसरून पडल्याने ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. ८ जानेवारी) घडली.
मृत व्यक्तीचे नाव **महेश बबनराव चव्हाण (वय ४२, रा. कृष्णापुरी, पाचोरा)** असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश चव्हाण हे घरात बाथरूमकडे जात असताना अचानक पाय घसरून पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर त्यांच्या काका **प्रकाश शिवाजी चव्हाण** यांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, पाचोरा येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी **डॉ. विजय पाटील** यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात लेखी मेमो (MLC No. 1066/2026) द्वारे खबर दिली. त्यानुसार पाचोरा पोलीस ठाण्यात **अकस्मात मृत्यू नोंद क्र. 04/2025** बी.एन.एस.एस. कलम 194 अन्वये नोंद करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने **पो.हे.कॉ. श्रीकांत गायकवाड** हे करीत आहेत.



