नवीन युवक महिला झेन जी यांना काँग्रेस सोबत जोडून जिल्ह्यातील काँग्रेस मजबूत करा… खासदार चंद्रकांत हंडोरे

नवीन युवक महिला झेन जी यांना काँग्रेस सोबत जोडून जिल्ह्यातील काँग्रेस मजबूत करा… खासदार चंद्रकांत हंडोरे.

जळगाव- युवक महिला अल्पसंख्यांक व झेन जी यांना काँग्रेसने देशातील विद्यार्थी युवक व महिला यांच्यासाठी जे कार्य केले त्यात माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी केलेले कार्य 18 वर्षावरील मतदानाचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देशात कॉम्प्युटर व डिजिटल क्षेत्रातील क्रांती विविध अभियांत्रिकी विद्यापीठ अशा एक ना अनेक कामे त्यांनी केली आज राहुल गांधी हे सुद्धा विद्यार्थी व युवकांसाठी एक मोठा लढा उभा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा कार्य करीत आहे त्यामुळे आज देशात युवकांमध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे त्याचा उपयोग जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी केला पाहिजे असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे वर्किंग कमिटीचे सदस्य व खासदार श्री, चंद्रकांत हंडोरे यांनी काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड .अविनाश भालेराव, ज्येष्ठ नेते व माजी अध्यक्ष डॉक्टर ए. जी .भंगाळे, माजी सरचिटणीस ॲड.सलीम पटेल,प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे ,माजी सरचिटणीस विजय वाणी, माजी शहर जिल्हाध्यक्ष शाम तायडे, जिल्हा खजिनदार राहुल बाहेती, जिल्हा सरचिटणीस विजयकुमार कोसोदे, भीमशक्तीचे सुधीर भाई जंजाळे, प्रा. राजू भोसले, एस.सी. सेलचे जिल्हा अध्यक्ष ॲड .अंकुश कटारे, संदीप कुमावत ,प्रवीण पाटील ,नितीन राजपूत पारोळा शहर अध्यक्ष भिकन अहिरे,जाकिर बागवान आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार जिल्हा सरचिटणीस बाबा देशमुख यांनी मानले



