खान्देश

भाऊसाहेब उत्तमराव पाटील आडगावकर यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

भाऊसाहेब उत्तमराव पाटील आडगावकर यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव

नाशिक : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने योगदान देणारे **भाऊसाहेब उत्तमराव पाटील हे एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील रहिवाशी आहेत नुकताच त्यांना नाशिक येथे  यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, शैक्षणिक कार्यातील योगदान आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ यामुळे त्यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याची योग्य पावती मानली जात आहे.

“प्रिय मित्रा, तुला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून अभिनंदन! विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तू घेत असलेले कष्ट आणि शिक्षण क्षेत्रात देत असलेले योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे. तुझा हा यशस्वी प्रवास असाच सुरू राहो आणि भविष्यात तुला आणखी मोठे यश व सन्मान मिळो,”** अशा शब्दांत मित्रपरिवार व हितचिंतकांकडून भाऊसाहेब पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी काळातही ते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

न्यूज झेप इंडिया परिवाराकडूनही आपणांस हार्दिक शुभेच्छा

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button