खान्देश

शर्वरी कुलकर्णीची राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड; पिटीसीचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते सत्कार

  1. शर्वरी कुलकर्णीची राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड; पिटीसीचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते सत्कार

पाचोरा : येथील तारा राणी महिला क्रीडा संकुलातील खेळाडू कु. शर्वरी निलेश कुलकर्णी हिने शालेय जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर तिची आगामी राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर शर्वरीने हे यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पीटीसीचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते तिचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

शर्वरीच्या यशामागे तिचे प्रशिक्षक दिनेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच महावीर व्यायामशाळेचे अध्यक्ष राजू दादा, कैलास आभाळे सर, एस. के. पाटील सर आणि एस. के. पाटील आण्णा यांचेही मार्गदर्शन व प्रोत्साहन तिला मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शर्वरी सातत्याने सराव करून आपल्या खेळात उत्तरोत्तर प्रगती साधत आहे.

शर्वरीच्या या यशाबद्दल तारा राणी महिला क्रीडा संकुल, महावीर व्यायामशाळेचे पदाधिकारी, प्रशिक्षक, पालक तसेच क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन केले असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत

शर्वरीच्या या यशामुळे पाचोरा शहराच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही ती दमदार कामगिरी करून पाचोरा शहराचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button