लोहारी शिवारात बिबट्याचा पुन्हा वावर; म्हशीच्या पाररडुचा घेतला जीव !

लोहारी शिवारात बिबट्याचा पुन्हा वावर; म्हशीच्या पाररडुचा घेतला जीव !
लोहारी : लोहारी शिवारातील स्मशानभूमीजवळ पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारी ज्ञानेश्वर जाधव यांच्या शेतात बिबट्याने म्हशीच्या पारडावर हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची घटना घडली.
या घटनेमुळे लोहारी तसेच आर्वे परिसरातील नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकरी, मजूर तसेच पशुपालकांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे, तसेच रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, बिबट्याचा वावर वारंवार आढळून येत असल्याने वनविभागाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन परिसरात पाहणी करावी. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच पिंजरा लावण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी आर्वे व लोहारी येथील नागरिकांकडून होत आहे.
बिबट्याच्या सततच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



