खान्देश

महाकुंभ रोजगार मेळाव्यात प्रा. जयश्री वाघ यांच्या कलाकृतीने वेधले उपस्थितांचे लक्ष

महाकुंभ रोजगार मेळाव्यात प्रा. जयश्री वाघ यांच्या कलाकृतीने वेधले उपस्थितांचे लक्ष

**पाचोरा : श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या **महाकुंभ रोजगार मेळाव्याच्या** निमित्ताने एम. एम. महाविद्यालय, पाचोरा येथील प्राध्यापिका जयश्री वाघ यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे अत्यंत सुंदर व देखणे रांगोळीचित्र साकारून आपल्या कलात्मक प्रतिभेचा परिचय करून दिला.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे व्यक्तिमत्त्व रांगोळीच्या माध्यमातून साकारताना प्रा. जयश्रीताई वाघ यांनी रंगसंगती, रेखाटनातील बारकावे आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा सुरेख वापर केला. त्यांच्या या कलाकृतीने रोजगार मेळाव्यात उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. अनेकांनी त्यांच्या रांगोळीचे कौतुक करत त्यांच्या कलागुणांना दाद दिली.

प्रा. जयश्री वाघ यांना कलेची विशेष आवड असून त्या Fine Arts मध्ये टॉपर राहिल्या असुन अध्यापन क्षेत्रात कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या कलागुणांची जोपासना सातत्याने केली आहे. शिक्षण, कला, सामाजिक कार्य आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग या माध्यमातून त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व अधोरेखित होते.

त्यांनी साकारलेल्या या रांगोळीचित्रातून कला, कल्पकता, राष्ट्रपुरुषांविषयीचा आदर आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. महाकुंभ रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने साकारलेली ही कलाकृती उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरली असून, प्रा. जयश्री वाघ यांच्या कलात्मक योगदानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button