खान्देश

काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनासह दिले निवेदन*

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: जळगाव जिल्हा काँग्रेसची निष्पक्ष चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन*

*आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: जळगाव जिल्हा काँग्रेसची निष्पक्ष चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन*

*काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनासह दिले निवेदन*

जळगाव (डॉ. योगेश पाटील) – आयआयटी मुंबई (IIT Bombay) येथील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम) – अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करत करण्यात आली आहे. यासंदर्भात जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे

निवेदनात नमूद केल्यानुसार, साहिल वाकोडे याच्या कुटुंबाने गेल्या काही महिन्यांपासून त्याला जातीय अपमान, शिवीगाळ आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. साहिलने पहिल्या सेमिस्टरमध्ये उत्तम कामगिरी केली होती. मात्र, त्याच्या मृत्यूनंतर तपास पूर्ण होण्यापूर्वीच आयआयटी प्रशासनाने ‘परीक्षेत कॉपी केल्यामुळे त्याने आत्महत्या केली’ असा निष्कर्ष मांडला होता. त्यानंतर प्रशासनाने असा घाईघाईने निष्कर्ष काढणे अयोग्य असल्याचे मान्य करत माफी मागितली तसेच संबंधित प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

काँग्रेस कमिटीच्या मुख्य मागण्या:

१. निष्पक्ष चौकशी: साहिल वाकोडे याच्या मृत्यूची स्वतंत्र आणि सखोल चौकशी व्हावी.

२. जातीय छळाची चौकशी: त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या जातीय छळ, अपमान व मानसिक त्रासाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.

३. कठोर कारवाई: चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी.

४. आर्थिक मदत: साहिलच्या कुटुंबीयांना योग्य आर्थिक मदत, नुकसानभरपाई आणि आवश्यक कायदेशीर सहकार्य पुरवले जावे.

५. तक्रार निवारण यंत्रणा: IIT, केंद्रीय विद्यापीठे आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाविरोधात स्वतंत्र, पारदर्शक व प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा बंधनकारक करावी.

६. ठोस उपाययोजना: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि संविधानिक समानतेच्या हक्काच्या संरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात.

तीव्र आंदोलनाचा इशारा

शासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने ठोस व समाधानकारक कारवाई करावी, अन्यथा लोकशाही आणि संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही काँग्रेस कमिटीने दिला आहे.

या निवेदनावर जळगाव जिल्हा काँग्रेस (पश्चिम) अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अॅड. अंकुश कटारे, अॅड. कैलास शेळके यांच्यासह पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या सह्या आहेत.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button