खान्देश

राणी क्रीडा संकुलाच्या तीन महिला मल्लांची राज्यस्तरीय कुस्तीसाठी निवड !

राणी क्रीडा संकुलाच्या तीन महिला मल्लांची राज्यस्तरीय कुस्तीसाठी निवड

शर्वरी कुलकर्णी, अक्षरा बागुल व धनश्री पाटील यांची दमदार कामगिरी

पाचोरा : येथील तारा राणी महिला क्रीडा संकुलातील तीन महिला खेळाडूंनी शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. शर्वरी निलेश कुलकर्णी (६५ किलो), अक्षरा सुभाष बागुल (६२ किलो) आणि धनश्री बटू पाटील (४६ किलो) या तिन्ही खेळाडूंच्या यशामुळे पाचोरा शहराच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत शर्वरी निलेश कुलकर्णी हिने आपल्या गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या शानदार कामगिरीमुळे तिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. यासोबतच अक्षरा बागुल व धनश्री पाटील यांनीही आपल्या वजनगटात दमदार कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेची पात्रता मिळवली.

या तिन्ही खेळाडूंनी मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या यशाबद्दल पीटीसीचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते शर्वरी कुलकर्णी हिचा सत्कार करण्यात आला.

तारा राणी महिला क्रीडा संकुल व महावीर व्यायामशाळेचे पदाधिकारी, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी शर्वरी कुलकर्णी, अक्षरा बागुल व धनश्री पाटील यांचे अभिनंदन करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडूंना प्रशिक्षक दिनेश पाटील, अध्यक्ष राजू दादा, कैलास आभाळे , एस. के. पाटील  आणि एस. के. पाटील आण्णा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर या खेळाडूंनी आपल्या खेळात सातत्याने प्रगती साधली आहे.

तारा राणी महिला क्रीडा संकुलातील तीन महिला मल्लांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झालेली निवड ही पाचोरा शहराच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही या खेळाडू उत्तम कामगिरी करत पाचोरा शहरासह तारा राणी महिला क्रीडा संकुलाचे नाव राज्याच्या क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करतील, असा विश्वास क्रीडा प्रेमींनी व्यक्त केला आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button