खान्देश

जामनेरात एकदिवसीय अक्षरधारा कविसंमेलन उत्साहात संपन्न!

 जामनेरात एकदिवसीय कविसंमेलन उत्साहात

जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचा उपक्रम; राज्यभरातील ५० हून अधिक कवींचा सहभाग

जामनेर : जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे जामनेर येथील संत तुकाराम महाराज सभागृह तथा मराठा मंगल कार्यालयात आयोजित पहिले राज्यस्तरीय ‘अक्षरधारा’ एकदिवसीय कविसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. राज्यभरातून आलेल्या ५० हून अधिक कवी-कवयित्रींनी आपल्या दर्जेदार कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली.

कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी आयोजक समितीचे अध्यक्ष ईश्वर पाटील होते. तर जी.एस. सोसायटीचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या हस्ते कविसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष राम पवार, जितेंद्र बहारे, डॉ. अनिल पाटील, प्रा. विमलताई वाणी, ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश्वर घुले, प्रा. अक्षय पाटील, किशोर काळे, संदीप पाटील, जयश्री देवरे, अशोक कोळी** आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्याच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या कवी-कवयित्रींनी विविध सामाजिक, सांस्कृतिक, प्रेम, वास्तववादी तसेच संवेदनशील विषयांवरील कविता सादर करत संमेलनाला बहार आणली. काव्यरसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कवींना दाद दिली.

या प्रसंगी कवी दीपक वारंगणे लिखित ‘वेणू’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पाचोरा येथील कवी सुशिलकुमार शिंदे आणि ह.भ.प. दिवाकर महाराज चौधरी यांनीही आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमास भुसावळ शिक्षक सोसायटीचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक व साहित्यिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी आहेर यांनी केले. गंगाराम नरवाडे, योगेश पाटील व सुनील चौधरी यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर डॉ. बाजीराव पाटील यांनी आभार मानले.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button