खान्देश

११ ऑक्टोबरला जळगाव जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन

११ ऑक्टोबरला जळगाव जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन

पाचोरा / (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा ॲम्युचर नेटबॉल स्पोर्ट्स असोसिएशन, ता. जि जळगाव यांच्या वतीने रविवार,११ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव जिल्हास्तरीय नेटबॉल सब ज्युनिअर व ज्युनिअर अजिंक्य पद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव येथील मैदानावर होणार आहे.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच क्रीडा मंडळाचे संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत १६ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात सामने खेळविण्यात येणार आहेत. १६ वर्षांखालील गटासाठी १ जानेवारी २०११ नंतरचा जन्म, तर १९ वर्षांखालील गटासाठी १ जानेवारी २००८ नंतरचा जन्म असलेले खेळाडू पात्र राहतील.

स्पर्धेसाठी रविवार, ११ आक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता उपस्थिती अनिवार्य असून, प्रवेश नोंदणीची अंतिम मुदत शनिवार, १० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत आहे. प्रवेश शुल्क प्रति खेळाडू 50 रुपये ठेवण्यात आले आहे. सहभागी संघांकडे स्वतःचे बिब्स असणे आवश्यक असून प्रत्येक खेळाडूकडे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये आणि क्लबच्या संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जळगाव जिल्हा ॲम्युचर नेटबॉल स्पोर्ट्स असोसिएशनचे मा. अध्यक्ष सुरेश दामू भोळे कार्यअध्यक्ष प्रमोद पाटील खजिनदार विद्या भांबळे व सचिव निलेश चौधरी यांनी केले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी मो. ७७०९३ ३६५१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button