खान्देश

खाकी पलीकडचे जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीसह कौटुंबिक जीवनाचा मानसशास्त्रीय वेध

खाकी पलीकडचे जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीसह कौटुंबिक जीवनाचा मानसशास्त्रीय वेध

पाचोरा, दि. १८ सप्टेंबर २०२६ : पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याच्या पलीकडील मानसिक, शारीरिक व कौटुंबिक जीवनाचा संवेदनशील आणि संशोधनात्मक वेध घेणारे एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सुवर्णा पाटील लिखित ‘खाकी पलीकडचे जीवन : पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीचा आणि कुटुंब जीवनाचा मानसशास्त्रीय वेध’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

पी.टी.सी. संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन  संजय वाघ, व्हा. चेअरमन व्ही.टी. जोशी, संस्थेचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव वले आणि उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

पोलीस कर्मचाऱ्यांचे अनिश्चित कामाचे स्वरूप, सततचा कामाचा ताण, कर्तव्य आणि कौटुंबिक जीवनातील समतोल, तसेच पोलीस पत्नी, मुले आणि कुटुंबीयांच्या भावविश्वाचा या पुस्तकातून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करण्यात आला आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागे उभ्या असलेल्या कुटुंबाच्या निःशब्द त्यागाची आणि योगदानाचीही प्रभावीपणे नोंद या पुस्तकात करण्यात आली आहे.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे संशोधनात्मक माहितीला केस स्टडी, अनुभवकथन आणि भावनिक प्रसंगांची जोड देत पोलीस जीवनाचा मानवी पैलू वाचकांसमोर मांडण्यात आला आहे. त्यामुळे ‘खाकी’च्या गणवेशामागे दडलेले भावविश्व, जबाबदाऱ्या, संघर्ष आणि कौटुंबिक समायोजन यांचे वास्तववादी चित्र या पुस्तकातून उलगडते.

प्रा. डॉ. सुवर्णा पाटील या पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील यांच्या पत्नी आहेत. पोलीस कुटुंबाचा एक भाग म्हणून अनुभवलेले वास्तव, बारकाईने केलेली निरीक्षणे आणि संशोधनात्मक दृष्टिकोन यांची सांगड घालत त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना, जबाबदाऱ्या आणि त्यागाचा पैलूही पुस्तकातून प्रभावीपणे समोर येतो.

प्रकाशन सोहळ्यास संस्थेचे पदाधिकारी, मान्यवर, प्राध्यापक, सहकारी, मित्रपरिवार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रा. डॉ. सुवर्णा पाटील यांच्या या संशोधनात्मक व संवेदनशील साहित्यकृतीचे कौतुक करून त्यांच्या पुढील साहित्यिक व संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button