जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 25 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान..

*जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 25 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान..*
जळगाव …..5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे दुपारी दोन वाजता जळगाव जिल्ह्यातील ज्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले अशा 25 शिक्षक बांधवांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.अविनाश भालेराव हे होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, प्रदेश सरचिटणीस हाजी मुक्ती हारून,प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे ,अखिल भारतीय सेवा दलाचे सचिव विनोद कोळपकर, प्रदेश सरचिटणीस ॲड .सलीम पटेल, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय महाजन, प्राचार्य एस एस राणे ,माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, काँग्रेस उपाध्यक्ष अशोक खलाणे, धनगर अण्णा पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार कोसोदे जिल्हा खजिनदार राहुल बाहेती ,ज्येष्ठ नेते श्रीधर चौधरी ,विजय वाणी, एससी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड अंकुश कटारे ,हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी शिक्षकांच्या शिक्षणाच्या योगदानासंदर्भात व त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव आपल्या मनोगत व्यक्त केला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या आदर्श शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यात श्रीमती रूपाली पाटील पाचोरा, श्रीमती सुनिता पाटील जळगाव, श्रीमती रूपाली देवरे जळगाव, श्रीमती डॉक्टर अर्चना सूर्यवंशी जळगाव , श्रीमती अनिता सतीश पाटील जळगाव, प्राध्यापक सागर सोनवणे जळगाव, प्रसन्न रमेश खंडाळे चाळीसगाव, भटू आव्हाळे एरंडोल ,राजेंद्र मधुकरराव देशमुख अमळनेर, प्रमोद धर्मराज पाटील धरणगाव, हिलाल पुंडलिक पाटील अमळनेर, विनोद प्रकाश पाटील चोपडा, दीपक हरी सोनार चोपडा, प्राध्यापक वासुदेव पाटील जळगाव, गजानन अशोक सुरवाडे भुसावळ, मोहसीन खान अजित खान जळगाव,अशोक सोनू पार्टी जळगाव, मनोहर भजनलाल तेजवानी जळगाव, डॉक्टर संजय कुमार सोनवणे धरणगाव, सुनील भिवा जाधव पारोळा ,प्राध्यापक इक्बाल मिर्झा जळगाव ,श्री नरेंद्र भोई जळगाव, भिका सोमा सपकाळे आवार तालुका जळगाव , दिनेश नवल चव्हाण, एरंडोल यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रवीण पाटील सर यांनी केले सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस बाबा देशमुख यांनी केले आभार प्रदर्शन प्रदीप सोनवणे यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला दीपक सोनवणे युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पटेल ,अध्यक्ष कौस्तुभ पाटील, जाकीर बागवान अर्चना गाडे ,छाया कोरडे लीला सोनवणे ,प्रभाकर महाजन , राजू भोसले यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते



