वाळू तस्करांनी तलाठ्यांच्या पथकावर हल्ला प्रकरणी ९ आरोपींवर मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

0 33

वाळू तस्करांनी तलाठ्यांच्या पथकावर हल्ला प्रकरणी ९ आरोपींवर मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

भरवस येथे झाला होता हल्ला , ९ जणांवर गुन्हा , डीवायएसपींनी स्वत : घेतला तपासाचा आढावा 

भरवस ( ता . अमळनेर ) जवळ ४ मार्चच्या रात्री वाळू तस्करांनी तलाठ्यांच्या पथकावर हल्ला केला होता . याप्रकरणी ९ आरोपींवर मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे . या आरोपींना अटक करावी , या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे . शुक्रवारी देखील आंदोलन कायम असल्याने महसूल विभागाची कामे खोळंबली . याचा सर्वसामान्यांना फटका बसला . दरम्यान , पोलिसांची तीन पथके आरोपींचा शोध घेत आहेत . डीवायएसपी राजेंद्र ससाणे यांचे मार्गदर्शनाखाली मारवड पोलिसांचे दोन आणि डीवायएसपी कार्यालयाचे एक अशी तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत . मात्र , तलाठ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक होईपर्यंत काम बंद कायम ठेवण्याची भूमिका तलाठी संघटनेने घेतली आहे . त्यास महसूल कर्मचारी संघटना , कोतवाल संघटना , अमळनेर तालुका पोलिस पाटील संघटनेने पाठिंबा दिला आहे . सोमवारपासून उपविभागीय तलाठी संघटना आंदोलनात सहभागी होईल . यामुळे शेतकरी व नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल संघटना दिलगिर असल्याचे तलाठी संघटनेचे अध्यक्ष गणेश महाजन यांनी सांगितले . आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत . पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत , असे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सांगितले . तर आरोपी लवकरच गजाआड दिसतील , अशी माहिती डीवायएसपी राजेंद्र ससाणे यांनी दिली . त्याअनुषंगाने त्यांनी पोलिसांकडून आढावा देखील घेतला . 

भरवस येथे झाला होता हल्ला , ९ जणांवर गुन्हा , डीवायएसपींनी स्वत : घेतला तपासाचा आढावा 

तलाठ्यांवर हल्ला , वाळूमाफियांच्या शोधासाठी तीन पथके रवाना , महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद ‘ कायम

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.