स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिक अमोल बनकर यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; ९७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिक अमोल बनकर यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; ९७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
तारखेडा बु. | प्रतिनिधी
*देशसेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत भारतीय सैन्य दलातील सैनिक श्री. अमोल गोविंदा बनकर यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविला.* कै. गोविंदा ओंकार बनकर यांच्या स्मरणार्थ भाऊसाहेब बाजीराव ओंकार पाटील माध्यमिक विद्यालय, तारखेडा बु. येथे या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत वसतिगृहातील *३५ विद्यार्थ्यांना* पंखे, नोटबुक, पेन, पेन्सिल, किटबॉक्स तसेच बिस्कीट पुडे देण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील *६२ विद्यार्थ्यांना* ड्रॉईंग बुक, कलर बॉक्स, पेन, पेन्सिल, किटबॉक्स व बिस्कीट पुडे शैक्षणिक साहित्य म्हणून भेट देण्यात आले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. *देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना आपल्या गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक योगदान देण्याचा श्री. अमोल बनकर यांचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.*
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल *श्री. अमोल गोविंदा बनकर यांचे तसेच तारखेडा बु. व परिसरातील सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार* व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमासाठी *अरुण ओंकार बनकर, अमोल गोविंदा बनकर, समाधान बापू बनकर, किरण गोविंदा बनकर, प्रवीण संजय बनकर, प्रथम अरुण बनकर* तसेच समस्त मित्रपरिवार व ग्रामस्थ मंडळी तारखेडा बुद्रुक यांनी सहकार्य केले.
देशसेवेसोबत समाजसेवा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम स्वातंत्र्य दिनाचा सामाजिक संदेश अधिक प्रभावी करणारा ठरला.



