खान्देश

पाचोरा पोलिसांचा अवैध सट्टा व्यवसायावर मोठा प्रहार; जळगाव गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत कल्याण सट्टा पेढीवर छापा, एक आरोपी ताब्यात !

पाचोरा पोलिसांचा अवैध सट्टा व्यवसायावर मोठा प्रहार; जळगाव गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत कल्याण सट्टा पेढीवर छापा, एक आरोपी ताब्यात !

**पाचोरा | न्यूज झेप इंडिया प्रतिनिधी**

पाचोरा शहरात सुरू असलेल्या अवैध सट्टा-जुगार व्यवसायाविरोधात पाचोरा पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत कल्याण सट्टा पेढीवर छापा टाकला. या कारवाईत एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, सट्टा व्यवसायासाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुवार (दि. ६ ऑगस्ट २०२६) रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

पाचोरा शहर व परिसरात वाढत्या अवैध सट्टा-जुगार व्यवसायाला आळा घालण्यासाठी पाचोरा पोलीस ठाण्याकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाचोरा पोलीस व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने कल्याण सट्टा पेढीवर धाड टाकत ही यशस्वी कारवाई केली. कारवाईदरम्यान सट्टा व्यवहारासाठी वापरण्यात येणारे साहित्य व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे, सहाय्यक फौजदार विलास पाटील, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील व जितेंद्र पाटील, तसेच पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश पाटील, संतोष राजपूत, पवन पाटील* आणि पाचोरा डी.बी. पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या संयुक्त कारवाईमुळे अवैध सट्टा-जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संबंधित आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत पुढील तपास सुरू आहे.

अवैध सट्टा-जुगार, मटका तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पाचोरा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

* न्यूज झेप इंडिया*

**”सत्याची बाजू • जनतेचा आवाज”**

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button