खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ३० हजारांची चोरीची मोटारसायकल जप्त, रेकॉर्डवरील आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ३० हजारांची चोरीची मोटारसायकल जप्त, रेकॉर्डवरील आरोपी अटकेत

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत ३० हजार रुपये किंमतीची चोरीची मोटारसायकल हस्तगत केली असून, वाहन चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवरील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील वाहन चोरीच्या प्रकरणांचा छडा लावून चोरीस गेलेली वाहने हस्तगत करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांना विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथकाची स्थापना करून वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला.

तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपी विभोर (विशाल) जुलाल जाधव (रा. एरंडोल, सध्या रा. विवरे खुर्द, ता. रावेर) याच्याकडे हिरो डिलक्स कंपनीची एमएच-१९-बीटी-९४३३ क्रमांकाची लाल-काळ्या रंगाची मोटारसायकल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने विवरे खुर्द येथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.

मोटारसायकलीबाबत कागदपत्रांची मागणी केली असता आरोपीने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर कसून चौकशी केली असता त्याने ही मोटारसायकल जळगाव महानगरपालिकेच्या पार्किंगमधून चोरी केल्याची कबुली दिली.

यानंतर जिल्हा गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता, सदर मोटारसायकल संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. १२६/२०२३, भादंवि कलम ३७९ अन्वये वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीसांनी आरोपीकडून ३० हजार रुपये किंमतीची हिरो डिलक्स मोटारसायकल जप्त केली असून, आरोपीविरुद्ध यापूर्वीही घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा इतर गुन्ह्यांतील सहभागही तपासला जात असून पुढील तपास जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. नंदलाल पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोउनि सोपान गोरे, पोहेकॉ. लक्ष्मण पाटील, पोना राहुल पाटील, पोकॉ. जितेंद्र पाटील, पोकॉ. भूषण पाटील आणि पोकॉ. राहुल महाजन यांचा समावेश होता.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button