रोटरी क्लब तर्फे पाचोरा येथील कन्या शाळेला क्रीडा साहित्य भेट !

रोटरी क्लब तर्फे पाचोरा येथील कन्या शाळेला क्रीडा साहित्य भेट
पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव यांचे तर्फे शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक ( मिठाबाई )कन्या विद्यालयाला क्रीडा साहित्य भेट देण्यात आले. दिनांक 5 ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, प्रशासन सेक्रेटरी डॉ. स्वप्निल पाटील, प्रोजेक्ट सेक्रेटरी डॉ. प्रशांत सांगडे, या प्रोजेक्टचे चेअरमन रो. गिरीश दुसाने, असिस्टंट गव्हर्नर रो. भरत सिनकर, एंकलेव्ह सेक्रेटरी डॉ मुकेश तेली, ज्येष्ठ रोटेरीयन चंद्रकांत लोढाया, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. कुणाल पाटील, निखिल बिडकर, हर्षल चित्ते, पिंकीताई जिनोदिया, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कन्या शाळेतील विद्यार्थिनींना लगोरी,रबर रिंग, स्किपिंग रोप, बॅडमिंटन रॅकेट, लुडो, फुटबॉल, थाळी, गोळा, लेझीम सेट इत्यादी क्रीडा साहित्य भेट देण्यात आले .
“शालेय व महाविद्यालयीन जीवनातील खेळातूनच उत्तम आरोग्य घडते. खेळ भावनेतूनच यशस्वी व आदर्श जीवनाचे धडे मिळतात म्हणून प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्या आवडीच्या खेळातून प्राविण्य मिळवावे” असे आवाहन राष्ट्रीय बॅडमिंटनपटू पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी यावेळी केले.
प्रा. रवींद्र चव्हाण व संगीता बाविस्कर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. क्रीडा शिक्षक अनिल पवार यांनी क्रीडा साहित्य स्वीकारले. प्रा. अंकिता देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. संगीता राजपूत, जयदीप पाटील, नंदू पाटील, सुरेखा बडे,उमेश कडलग, पायल पाटील, शिवाजी बागुल, कोमल चव्हाण, शिवराम पाटील,, धनराज धनगर, शकील खाटीक यांनी परिश्रम घेतले.



