पाचोरा पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी आबासाहेब पाटील व विकास सूर्यवंशी यांचा बदलीनिमित्त सत्कार

पाचोरा पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी आबासाहेब पाटील व विकास सूर्यवंशी यांचा बदलीनिमित्त सत्कार
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले विशेष पोलीस कर्मचारी आबासाहेब पाटील व विकास सूर्यवंशी यांची पाचोरा येथून पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे बदली झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये बदलीनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या हस्ते दोन्ही कर्मचाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील तसेच पाचोरा पोलीस स्टेशनमधील अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी श्री. आबासाहेब पाटील व श्री. विकास सूर्यवंशी यांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये बजावलेल्या कर्तव्याची प्रशंसा करत त्यांच्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व शिस्तबद्ध सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. पुढील सेवाकाळातही त्यांनी उत्कृष्ट कार्य करून पोलीस दलाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना दोन्ही कर्मचाऱ्यांनी पाचोरा पोलीस स्टेशनमधील अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि वरिष्ठांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे वातावरण भावनिक आणि उत्साहपूर्ण होते.



