खान्देश

परम संत ठाकर सिंहजी महाराज व संत बलजित सिंहजी महाराज यांच्या आशीर्वादाने पाचोऱ्यात गुरुपौर्णिमा उत्साहात !

परम संत ठाकर सिंहजी महाराज व संत बलजित सिंहजी महाराज यांच्या आशीर्वादाने पाचोऱ्यात गुरुपौर्णिमा उत्साहात

पाचोरा | प्रतिनिधी

परम संत ठाकर सिंहजी महाराज तसेच त्यांचे सत्स्वरूप उत्तराधिकारी संत बलजित सिंहजी महाराज यांच्या आशीर्वादाने व आज्ञेनुसार विश्व मानव रुहानी केंद्र, नवानगर शाखा, पाचोरा (वरखेडी रोड, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात संत बलजित सिंहजी महाराज यांच्या अमृतमय वाणीवरील सत्संग प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात आला. उपस्थित भाविकांनी संतांच्या आध्यात्मिक विचारांचे श्रवण करून आत्मिक समाधानाचा लाभ घेतला.

यानंतर अन्नदान, महाप्रसाद वितरण तसेच नामदान (गुरुदीक्षा) कार्यक्रम अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमाला पाचोरा, भडगाव शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येने शिष्य, भाविक आणि भक्त उपस्थित होते. तसेच पाचोरा शाखेचे सर्व प्रबंधक समिती सदस्य, सेवेदार व प्रचारक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

यावेळी प्रचारकांनी उपस्थितांना संत बलजित सिंहजी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार मानवी जीवनाचा खरा उद्देश, निष्काम सेवा, नम्रता, परोपकार, आत्मिक व मानसिक विकासासाठी परमेश्वराच्या नामस्मरणाचे महत्त्व तसेच ध्यान-धारणा (मेडिटेशन) याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यासोबतच मांसाहार व जीवहत्येचा त्याग, दारूमुक्ती व व्यसनमुक्तीचा संदेशही देण्यात आला.

विश्व मानव रुहानी केंद्राच्या माध्यमातून समाजहितासाठी मोफत सत्संग प्रवचने, मोफत वैद्यकीय शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण तसेच विविध सामाजिक व मानवसेवेचे उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संत बलजित सिंहजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली विश्व मानव रुहानी केंद्र, नवानगरच्या सर्व शाखा व उपशाखांमार्फत मानवतेच्या कल्याणासाठी हे कार्य अविरत सुरू असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित हजारो भाविकांनी गुरु, भगवान महादेव व आदिशक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करत “धन धन सतगुरू”, “हर हर महादेव” आणि “जय मातादी” अशा जयघोषांनी परिसर भक्तिमय केला.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button