खान्देश

घरगुती वापराकामी मिटरची डिमांडनोट मिळावी. टोणगाव शिवारातील शेतकर्यांचे भडगाव तहसिल कार्यालयासमोरील उपोषण लेखी आश्वासनाने सुटले

*भडगाव- प्रतिनिधि -(संजय शेवाळे) -घरगुती वापराकामी मिटरची डिमांडनोट मिळावी. टोणगाव शिवारातील शेतकर्यांचे भडगाव तहसिल कार्यालयासमोरील उपोषण लेखी आश्वासनाने सुटले*.

भडगाव वार्ताहर — टोणगाव शेतशिवारात राहणार्या वस्तीतील शेतकर्यांनी घरगुती वापराकामी मिटरची डिमांडनोट मिळावी. या मागणीचे निवेदन भडगाव येथील टोणगाव शिवारातील वस्तीतील शेतकर्यांनी भडगाव विज वितरण कंपनीसह इतरञ दिलेले होते. माञ विज वितरण प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे या वस्तीतील शेतकर्यांनी आज सकाळी ११ वाजेपासुन भडगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणास सुनिता संजय परदेशी, सुरेखा इंदल परदेशी, जानकाबाई हरी परदेशी, हरी लालचंद परदेशी, संजय लालचंद परदेशी, इंदल लालचंद परदेशी , नथा भिवा अहिरे, कमलबाई पुंडलीक अहिरे, प्रमिलाबाई कृष्णा अहिरे यांचेसह शेतकरी बसलेले होते. उपोषण स्थळी भडगाव विज वितरणचे उपअभियंता योगेश पाटील, शाखा अभियंता रविंद्र राऊळ यांनी भेट देउन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.

विज वितरणच्या अधिकार्यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण सोडण्यात आले. तसेच याबाबतचा सर्वेही आजच करुन यासाठी अंदाजपञक तयार करुन या योजना मंजुरीकामी तात्काळ पाठविण्यात येईल. याकामी आम्ही वरीष्ठांकडे पाठपुरावा करु. अशी माहितीही भडगाव विज वितरणचे उपअभियंता योगेश पाटील, शाखा अभियंता रविंद्र राऊळ यांनी दिली. उपोषणस्थळी भडगाव माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, बन्सीलाल परदेशी, विजय दोधा पाटील, उद्धव ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख अनिल पाटील, गोरख वेळीस, तौसीफखान, पञकार सुनिल कासार, नरेंद्र पाटील, ओमप्रसाद पाटील, अबरार मिर्झा, प्रदिप महाजन, नरेंद्र मोरे, प्रहार दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष राजेंद्र परदेशी, भाऊसाहेब सुर्यवंशी, विक्रम सोनवणे, आबा कासार, मोतीलाल वंजारी, सुनिल पवार , गणेश परदेशी , शरद हिरे, सुभाष परदेशी, किरण परदेशी पिंपळगाव बुद्रुक, सुभाष ठाकरे, प्रताप पाटील, संजय परदेशी वडजी, जयेश परदेशी, निंभोरा उपसरपंच विश्वास पाटील, संजय पाटील, दिलीप कदम कजगाव, राजेंद्र पाटील, भुषण पवार आदिंनी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दिला. या टोणगाव शिवारातील वस्तीतील रहिवाशी शेतकर्यांना भडगाव शहराप्रमाणे विज पुरवठा सुरळीत मिळण्यासाठी शासनाच्या जिल्हा नियोजन समीतीच्या निधी अंतर्गत विज पुरवठा करणेकामी शिफारस पञ दि. १७/६/२०१९ रोजी कार्यकारी अभियंता म. रा. वि. विदयुत कंपनी पाचोरा विभाग पाचोरा यांना दिलेले आहे. माञ याकडे विज वितरण कंपनीच्या मागील अधिकार्यांचे दुर्लक्ष झाल्याचे उपोषण कर्त्यांनी सांगीतले. तसेच या शेतकर्यांनी यापुर्वीच आम्हाला घरगुती इलेक्टीृक डिमांडनोट मिळणेबाबत आँनलाईन प्रक्रीया पुर्ण केलेली होती. माञ तरीही या शेतकर्यांना घरगुती विज मिटरसाठी डिमांडनोट मिळाली नाही. या शेतकर्यांनी आम्हाला तात्काळ घरगुती विज मिटरसाठी डिमांडनोट मिळावी. या मागणीचे निवेदन आमदार किशोर पाटील, विज वितरणचे अभियंता योगेश पाटील, अधिक्षक अभियंता, जिल्हाधिकारी, उर्जा मंञी, मुख्यमंञी एकनाथ शिंदे, केंद्रीय उर्जा मंञी, तहसिलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आदिंना देण्यात आल्या होत्या. या निवेदनात म्हटले होते कि, आम्ही रीतसर घरगुती विज मिटरसाठी कनेक्शन मागत आहोत. मागेल त्याला विज कनेक्शन ही शासनाची भुमिका आहे. तसेच आम्ही जंगलात राहतो. आमचे लहान मोठे मुले अंधारात जिवन जगत आहेत. राञी सर्प, किडे काटे, बिबटया तर रानडुकरांचा वावर असतो. त्यामुळे आमच्या जिवीताला धोका कायम आहे. असे या दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे. आमदार किशोर पाटील या टोणगाव

वस्तीत राहणार्या शेतकर्यांसाठी भडगाव शहराप्रमाणे घरगुती विज पुरवठा मिळावा यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधी अंतर्गत विज पुरवठा करण्याकामी शिफारस पञ पुन्हा देणार आहेत. आमदार किशोर पाटील यांनी भडगाव विज वितरणचे अभियंता योगेश पाटील यांना या टोणगाव वस्तीसाठी विज पुरवठाकामी तात्काळ अंदाजपञक तयार करुन मंजुरीसाठी पाठवा. आपण मंजुरीसाठी प्रयत्न करुन या शेतकर्यांना न्याय मिळवुन देऊ. असे आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी या उपोषणकर्त्या शेतकर्यांना यापुर्वीच भेट घेतली असता दिलेले आहे. तरी विज वितरण कंपनीने तात्काळ न्याय या टोणगाव शिवारातील रहिवाशी शेतकर्यांना दयावा अशी अपेक्षा आहे.

उपोषणकर्त्यांना भडगाव विज वितरण कंपनीचे भडगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी दिलेल्या लेखी पञात नमुद केले आहे कि, भडगाव येथे जमिन गट नं. १२९ / १/ ब हया शेतवस्तीत घरगुती वापराकामी मिटरची डिमांडनोट मिळणेबाबतच्या मागणी अर्जाच्या अनुषंगाने महावितरणच्या आँलाईन प्रणालीद्धारे आज आपणाद्धारे अ — १ अर्ज करण्यात आले आहे. अर्जानुसार आणि म. रा. वि. वि. कंपनी मर्यादीत यांचे प्रचलीत नियमानुसार आपणास विज जोडणीकामी आवश्यक असलेल्या पायाभुत सुविधेसाठीचे अंदाजपञक वरिष्ठ कार्यालयास मंजुरीसाठी पाठविण्याची कार्यवाही त्वरीत करण्यात येईल. असेही या पञात शेवटी नमुद केलेले आहे.

फोटो — भडगाव तहसिलकार्यालयासमोर टोणगाव येथील सुरु असलेल्या उपोषणकर्त्या शेतकर्यांना लेखी पञ देतांना भडगाव विज वितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेश पाटील.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button