पाचोरा येथे ” सोहळा सख्यांचा ” फक्त पाचोर्यातील भगिनींसाठी” टीव्ही शो चित्रीकरण!

पाचोरा भगिनींसाठी ” सोहळा सख्यांचा फक्त पाचोर्यातील भगिनींसाठी” टीव्ही शो चित्रीकरण!
पाचोरा (डॉ. योगेश पाटील) – पाचोरा शहरातील महिलांसाठी एक खास कार्यक्रम “फक्त पाचोर्यातील भगिनींसाठी” सोहळा सख्यांचा या नावाने आयोजित करण्यात आले आहे. हा शो अहिर सुवर्ण मंगल कार्यालयात, ४ एप्रिल २०२५ रोजी, संध्याकाळी ४:०० वाजता आयोजित केला आहे.
यामध्ये सहभागी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही. महिलांना आकर्षक बनवण्यासाठी “वॉटरप्रूफ मराठमोळा” मेकअप करून येण्याचे आवाहन केले आहे. तसेच यामध्ये मनोरंजन , बुद्धिचातुर्य , संस्कृती चे दर्शन व एका महिलेच्या मनातील अबोला रुसवा इत्यादी गोष्टींचा समावेश असून महिलांना हवा हवा सा वाटणारा हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचा पाचोरा येथे चित्रीकरण म्हणजेच महिलांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे .
या शोमध्ये पाचोऱ्यातील “प्रथमच टीव्ही शो” चं चित्रीकरण होणार आहे, ज्यात दोन्ही एपिसोड्स चित्रीत केले जातील. पहिला एपिसोड संध्याकाळी ४:०० ते ६:०० वाजता, तर दुसरा एपिसोड ६:०० ते ८:०० वाजता शूट केला जाईल.
एन्ट्री फ्री ऑफ कॉस्ट आहे, परंतु सीट्स लिमिटेड आहेत. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा आणि आपले सीट बुक करा. बुकिंगसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.
संपर्कासाठी बुकिंग पत्रिकेत नंबर: 9022650013 , 9922092896
कार्यक्रमाचे आयोजक:
ललिता ताई पाटील
आदिती मयूर सराफ
प्रियंका रोहन पाटील



