महाराष्ट्र शासनाच्या १०० कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कासोदा पोलीस स्टेशनने दाखल गुन्ह्याचा २४ तासांत तपास व दोषारोप न्यायालयात केले दाखल!

कासोदा पोलीस स्टेशनने दाखल गुन्ह्याचा तपास २४ तासांत पूर्ण केला!
महाराष्ट्र शासनाच्या १०० कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कासोदा पोलीस स्टेशनने दाखल गुन्ह्याचा २४ तासांत तपास व दोषारोप दाखल!
दाखल गुन्ह्याचे २४ तासाच्या आत, तपास करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल करणारे कासोदा पोलीस स्टेशन ठरले जिल्ह्यात पहिले !
पाचोरा (डॉ. योगेश पाटील) – जळगांव जिल्ह्यातीलमहाराष्ट्र शासनाच्या १०० कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने कासोदा पोलीस स्टेशनने दाखल गुन्ह्याचा २४ तासांत तपास व दोषारोप दाखल! कासोदा पोलीस स्टेशनने ३ एप्रिल २०२५ रोजी दाखल गुन्ह्याचा तपास २४ तासांच्या आत पूर्ण करून एक नवीन आदर्श ठेवला आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता (B.N.S.) २०२३ अंतर्गत कलम ७४, ३३३, ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३), ३ (५) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्ह्याची फिर्याद कासोदा तालुक्यातील एक पिडीत महिलेनं दिली होती. सदर गुन्ह्यात चार आरोपी असताना, तपास अधिकारी पो.हे.कॉ. ब.नं. ६९८ राकेश निर्मला दत्तात्रय खोंडे यांनी तात्काळ तपास सुरु करून, आरोपींना सापडून सक्षम पुरावे गोळा केले. त्यानंतर आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र २४ तासांच्या आत मा. न्यायालयात दाखल करण्यात आले.
तपासाच्या दरम्यान, पोलीस अधिक्षक, जळगांव, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगांव भाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव भाग आणि सहायक पोलीस निरीक्षक, कासोदा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही केली गेली. महाराष्ट्र शासनाच्या १०० कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने हे कार्य करण्यात आले.
पो.हे.कॉ. ब.नं. ६९८ राकेश खोंडे यांचे अतिशय कर्तव्यदक्षतेने, समाजातील अत्याचारींवर कठोर कारवाई करून, समाजात महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल पोलीस दल आणि समाजातील सर्व स्तरांवरून त्यांचे कौतुक होत आहे.



