व्यसनमुक्तीसाठी संतविचारांची गरज — ह.भ.प. दिवाकर महाराज चौधरी

व्यसनमुक्तीसाठी संतविचारांची गरज — ह.भ.प. दिवाकर महाराज चौधरी
पाचोरा : जय जिजाऊ मित्र मंडळ, गुरुदत्त नगर, कृष्णापुरी, पाचोरा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त ‘व्यसनमुक्ती आणि संतांचे विचार’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी व्याख्याते ह.भ.प. दिवाकर महाराज चौधरी (रोटवदकर) यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी शैलीत मार्गदर्शन करताना आजच्या तरुण पिढीसाठी संतांचे विचार किती प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत, हे विविध उदाहरणांतून स्पष्ट केले. संतांनी दिलेला संयम, सदाचार, संस्कार आणि मानवतेचा संदेश तरुणांनी आचरणात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच वाढती व्यसनाधीनता ही व्यक्तीबरोबरच कुटुंब आणि संपूर्ण समाजासाठी घातक ठरत असून, तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून सकारात्मक व विधायक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी संतविचारांचा आधार घेणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी व्यसनाधिनता यावर नगरसेवक प्रदीप वाघ व डॉ. पत्रकार योगेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मा. प्रदीप वाघ, तसेच ‘न्यूज झेप इंडिया’ तथा ‘सह्याद्री भूषण’चे संपादक डॉ. योगेश पाटील , कैलास पाटील , प्रमोद महाजन उपस्थित होते. यावेळी प्रमोद महाजन यांच्यासह जय जिजाऊ मित्र मंडळाचे सदस्य अतुल जंजाळ, पवन बोरसे, जिभू पाटील, सोनू जंजाळ, भूषण पाटील, चेतन पाटील, समीर पाटील , भूषण महाजन, गजानन पाटील, बाबुलाल मिस्तरी, अनिल पाटील, सोनार भाऊसाहेब, समाधान पाटील, साई महाजन तसेच मंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक प्रबोधनपर व्याख्यानातून उपस्थितांना व्यसनमुक्तीचा संदेश आणि संत विचारांची प्रेरणा मिळाली.



