कृषीक्राईम

विनापरवाना व अनधिकृत गोडावूनमधून रासायनिक खत व सेंद्रीय खताच्या कारवातील परप्रांतीयांसह स्थानिकांची सखोल चौकशीची व्हावी !

विनापरवाना व अनधिकृत गोडावूनमधून रासायनिक खत व सेंद्रीय खताच्या कारवातील परप्रांतीयांसह स्थानिकांची सखोल चौकशीची व्हावी ! 

पाचोरा (योगेश पाटील निकम )- पाचोरा येथे विनापरवाना व अनधिकृत गोडावूनमधून रासायनिक खत व सेंद्रीय खताची गावेगावी, घरोघरी बिगर बिलाने विक्री होत असल्याची गुप्त माहिती समजल्यावरुन सदर प्रकारास आळा घालण्यासाठी विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव संभाजी ठाकूर यांच्या | मार्गदर्शनाखाली सापळयाचे नियोजन करण्यात आले. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगांव अरुण तायडे यांनी पाचोरा येथे येऊन उपविभागीय कृषि अधिकारी, पाचोरा नंदकिशोर नाईनवाड, कृषि अधिकारी, पंचायत समिती, पाचोरा मारुती भालेराव व कृषि पर्यवेक्षक अविनाश चंदीले यांना सोबत घेऊन पाचोरा तालुक्यातील जारगांव येथील मधुकर शंकर भोकरे यांच्या मालकीच्या गोडावूनची तपासणी केली असता तेथे विनापरवाना अनधिकृत खत साठा आढळून आला. पाचोरा जारगाव येथे असलेल्या कालच झालेल्या बोगस खत गोडाऊनवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत बिहार येथील दोन युवक फरार असल्याचे सांगितले जात आहे तर गोडावून मालक देखील फरार आहे . संबंधित कारवाई होऊनही या मागे अजूनही या युवकांसह त्यांचे साथीदार यांनी पाचोरा सह तालुक्यात अनेक गोडावून मध्ये हि अशाच प्रकारचा साठा असण्याची दाट शक्याता वर्तवन्यात येत आहे . काही शेतकरी बांधवांच्या अशाही प्रतिक्रिया येत आहेत कि आता गोडावून च्या जागाही बदलतील व मुख्य सीजन च्या वेळी असे परप्रांतीय वर डोके काढतील व त्याला स्थानिकच मदत करतील.  म्हणजेच नेहमीच असा सापडलेला माल कमी तर दाखविला जात नाही ना! यात आता शेतकऱ-यांच्या मनात शंका निर्माण होत आहेत . काही शेतकऱ-यांनी न्यूज झेप इंडियाशी बोलताना सांगितले कि आम्ही नुकतेच रासायनिक खते खरेदी केले असून आम्ही खरेदी केलेली खते तर बोगस अनधिकृत नाही ना ! कारण ज्या ठिकाणी आम्ही खते घेतली त्या ठिकाणी काही बॅग रेगुलर व काही दुकानदाराच्या मर्जीने घ्याव्या लागल्या , विशेष म्हणजे दरवर्षी बियाणे , खते बोगस असल्याच्या बातम्या आपण वाचतो पाहतो . परंतु मोठी कारवाई मात्र मुख्य सीजन वेळी होताना दिसत नाही . यामुळे मुख्य सीजन च्या आधीच कारवाई का होतात . परप्रांतीयच का सापडतात , त्यांना साथ देणारे जातात कुठे , ते कुठे गायब होतात. ज्या वेळेला शेतकऱ्यांना बियाणे असो कि फवारणीचे औषधी किंवा खते शेतका-र्यांना नको असलेले कोण देतो.(बियाणे व खतासोबत बच्चे हा प्रकार प्रचलित) माल असूनही कोण शेतकऱ्यांना वेठीस धरतो त्यावेळेला अधिकारी सुटीवर जातात का ? तसेच अशा घटना किंवा हा प्रकार शेतक-यांना लुटण्यास धन्य माणना-या व्यापा-र्यावर गुन्हे का दाखल होत नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी देखील अशा वेळी सजग व जागृत असणे गरजेचे आहे . असा कुठलाही प्रकार शेतकरी बांधवांना समजला तर आधी आपल्या जवळच्या शेतकरी गावकरी किंवा इतर बांधवाना त्या ठिकाणी बोलवा व नंतर अधिकारी यांना बोलवा म्हणजे असे प्रकार उजेडात येतील . कालच झालेल्या कारवाईत शेतकऱ-यांच्या भावनेशी खेळ करणा-या कंपनी व गोडाऊन भाड्याने घेणारा मोहरा असलेला दिपचंद्र श्रीवास कोण त्या गोडाऊन मध्ये माल कोणत्या अनधिकृत खते माफिया व्यापाऱ्यांचा होता का? .हे हि अद्याप स्पष्ट झाले नाही . ज्याप्रमाणे अनोळखी व्यक्तीला घर भाड्याने देतांना त्याची खातरजमा केली जाते तसे हे गोडावून कोणी देण्यास सांगितले . त्याचा करारनामा केला होता का . केला असेल तर कंपनीच्या नावे होता कि व्यापा-याच्या किंवा त्या युवकांच्या याचाही खुलासा कृषी अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन करणे गरजे आहे. अधिका-यांकडून  या प्रकरणात आर्थिक देवान घेवाणीचा वास लागता कामा नये? असेही शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया येत आहेत . तसेच अशा परप्रांतीय व त्यांना साथ देना-या स्थानिक गद्दारांचाही शोध कृषी विभाग व पोलीस प्रशासनाने घ्यावा . अशाच प्रकारे मागील काळात अवैध गुटख्यावर छापा टाकण्यांत आला होता . मुख्य सूत्रधार मात्र बाजूलाच राहिल्याचेही बोलले जात आहे . तसेच या कारवाईत देखील मुख्य सूत्रदार देखील बाजूलाच असल्याचे शहरात चर्चा चौका चौकात रंगत आहे . कारण एखाद्या कारवाई नंतर याच लोकांना मोकळे रान मिळते .कालच्या या कारवाईत गोडावून मध्ये रुपये २,३८,६२९/- किंमतीचा ६.७८ मे. टन खत साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत खत नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार पाचोरा पोलीस स्टेशन येथे क्र. १५४/२०२३ दिनांक १७.०५.२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये अनधिकृत, अवैधरीत्या व बिना बिलाने बियाणे व खतांची खरेदी करु नये. असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले असून अशा कृषि निविष्ठांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय यांचे मोबाईल क्र. ०८९८३८३९४६८ व दुरध्वनी क्र. ०२५७-२२३९०५४ वर माहिती द्यावी. असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये असले तरी या अनधिकृत खते प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी एक शेतकरी पुत्र या नात्याने न्यूज झेप इंडिया तर्फे करीत आहे.

 

 

 

 

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button