कृषीखान्देश

जारगांव शिवारातील गोडावूनमधून बोगस रासायनिक खतांच्या साठ्यावर कृषी व पोलीस प्रशासनाची अनेक वर्षातून मोठी कारवाई !

जारगांव शिवारातील गोडावूनमधून बोगस रासायनिक खतांच्या साठ्यावर कृषी व पोलीस प्रशासनाची अनेक वर्षातून मोठी कारवाई !

पाचोरा (डॉ.योगेश पाटील )- जारगांव शिवारातील गोडावूनमधून बोगस रासायनिक खतांच्या साठ्यावर कृषी व पोलीस प्रशासनाची अनेक वर्षातून मोठी कारवाई ! सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरालगत असलेल्या जारगाव शिवारात एका व्यक्तींच्या गोडावून मधे गुजरात येथील मिल्सन फार्मास कंपनीने तयार केलेल्या बोगस रासायनिक खतांची विक्री गावोगावी जावून विक्री होत असल्याची माहिती जळगाव येथील कृषी विभागाचे नियंत्रक अरुण तायडे यांना गुप्त माहिती मिळाली होती. या अनुषंगाने पाचोरा येथील उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड, पाचोरा पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम एस भालेराव,अरुण तायडे सह पाच जणांच्या पथकाने अचानक जारगाव येथील मधूकर शंकर भोकरे (वाणी) राहणार शिवाजी नगर पाचोरा यांचे मालकीचे गोडावूनच्या दरवाजाच्या फटीतून बघीतले असता खतांचा साठा आढळून आला.या बाबत समंधित अधिकारी यांनी परवाना मागीतला असता उडवा उडीचे उत्तरे देण्यात आली. या छाप्यात सदरगोडावून मधे २० लाख १९ हजार रुपये किमतीचे ७ टन बोगस रासायनिक खते आढळून आली. दरम्यान, गोडावून मालक मधूकर भोकरे हे फरार झाले असून त्यांनी हे गोदाम बिहार राज्यातील रहिवासी असणार्‍या दोन युवकांना भाड्याने दिले असल्याचे समजते. हे दोन परप्रांतीय युवक शेतकर्‍यांना गावोगावी जावून बोगस खते विक्री करत असल्याचे कृषी अधिकारी एम. एस. भालेराव यांनी सांगितले. कारवाई पथकाने सात टन बोगस रासायनिक खते ताब्यात घेतले असून पाचोरा येथील पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच या कारवाईत बिहार येथील दोन युवक फरार असल्याचे भालेराव यांनी सांगितले. संबंधित कारवाई होऊनही या मागे अजूनही या युवकांसह त्यांचे साथीदार यांनी पाचोरा सह तालुक्यात अनेक गोडावून मध्ये हि अशाच प्रकारचा साठा असण्याची दाट शक्याता असून नेहमीच असा सापडलेला माल कमी तर दाखविला जात नाही ना! यात ही जनतेच्या मनात शंका निर्माण होत आहेत,विशेष म्हणजे प्रत्यक्ष दर्शी यांनी सांगितले की , यात जवळपास ६० टॅन माल होता .यातील काही माल बुकिंग स्वरूपात विकल्याचेही कळते . तरी शेतकऱ-यांच्या भावनेशी खेळ करणा-या कंपनी व गोडाऊन भाड्याने घेणारा कोण त्या गोडाऊन मध्ये माल कोणत्या बोगस खते माफिया व्यापाऱ्यांचा आहे.ज्याप्रमाणे अनोळखी व्यक्तीला घर भाड्याने देतांना त्याची खातरजमा केली जाते तसे हे गोडावून कोणी देण्यास सांगितले . त्याचा करारनामा केला होता का . केला असेल तर कंपनीच्या नावे होता कि व्यापा-याच्या किंवा त्या युवकांच्या याचाही खुलासा होणे गरजेचे . अधिका-र्यांकडून या प्रकरणात आर्थिक देवान घेवाणीचा वास लागता कामा नये . नाही तर बळीराजा आपणास कदापीही माप करणार नाही याची नोंद संबधितांनी घ्यावी . तसेच अशा परप्रांतीय व त्यांना साथ देना-या स्थानिक गद्दारांचाही शोध कृषी विभाग व पोलीस प्रशासनाने घ्यावा . अशाच प्रकारे मागील काळात अवैध गुटख्यावर छापा टाकण्यांत आला होता . मुख्य सूत्रधार मात्र बाजूलाच राहिल्याचेही बोलले जात आहे . व आजही राजरोसपणे गुटखा अनेक टॅप-यावर होत असून पोटल्या हा प्रकार ही अनेक ठिकाणी सुरूच आहे. तरी यावरही दारूबंदी अधिकारी यांनी लक्ष द्यावे . यामुळे विभागाची प्रतिमा जनमानसात उजळेल . तूर्तास एवढेच .

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button