क्राईम

पाचोऱ्यात रेल्वेच्या ई – तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याचा पर्दाफाश..

पाचोऱ्यात रेल्वेच्या ई – तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याचा पर्दाफाश..

पाचोरा शहरातील रेल्वेच्या ई – तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

पाचोरा शहरात तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती क्राईम इंटेलिजन्स ब्रांच भुसावळ यांना मिळाली असता त्यांच्या पथकाने दिनांक १५ मे २०२३ रोजी दुपारी ०३:०० वाजेच्या सुमारास पाचोरा येथील द वृंदावन पॅलेस इंटरनेट कॅफेवर धाड टाकत त्यावरून वाणी नामक संशयित दुकान चालकाकडून प्राथमिक माहितीनुसार कॉम्प्युटरचे १८ यूजर आयडी पैकी त्यातील ४ बंद व उर्वरित १४ यूजर आयडी वरून सुमारे १७ हजार रुपये किंमतीची ८ तिकिटे, एक सीपीयू व एक मोबाईल असा मुद्देमाल ताब्यात घेतलेला असून जळगाव आरपीएफ कडे संशयितास सुपूर्त करण्यात आले असून, जळगाव आरपीएफ तर्फे संशयीताकडून सविस्तर तपशील घेण्याचे काम सुरू असून, याबाबत पुढील तपास जळगाव आरपीएफ निरीक्षक अधिकारी महेंद्र पाल यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ एस. बी. चौधरी हे करीत आहेत, रेल्वे कायदा १४३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button