जळगाव कलेक्टर कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टी तर्फे “चुल्हा जलाओ आंदोलन”

जळगाव कलेक्टर कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टी तर्फे “चुल्हा जलाओ आंदोलन”
जळगाव (प्रतिनिधी) – गॅस वाढ,पेट्रोल, डिझेल, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ, स्मार्ट मिटरच्या नावाखाली सामान्य माणसाची पिळवणुक ,नीट परीक्षेतील भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य जनता होरफळुन निघत आहे.या सर्व बाबींना केंद्रशासन जबाबदार आहे.म्हणुन बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने संपुर्ण भारतात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुस-या चरणातील “चुल्हा जलाओ आंदोलन” करण्यात आले.
वीज,गॅस, पेट्रोल, डिझेल या जीवनावश्यक गरजा झाल्या आहेत,जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे सर्व सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे.
स्मार्ट मीटर ही उद्योगपतींना केंद्रशासनाने लुट करण्यासाठी दिलेली संधी आहे.या स्मार्ट मिटरमुळे अनेक लोकांना आपल्या नोक-यांवर पाणी सोडावे लागत आहे.स्मार्ट मिटरमध्ये चीप असल्याने वीज युनिट सहजपणे वाढवता येऊ शकते.यामुळे खाजगी कंपन्या जनतेला लुटत आहे.
घरेलु आणि व्यावसायिक गॅसच्या वाढत्या किमती व त्याचा होणारा काळाबाजार यामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन मेटाकुटीला आले आहे…..हा केंद्रसरकारच्या नितीचा परिणाम आहे.
जनतेला वेठीस धरणा-या केंद्रसरकारच्या धोरणाच्या विरोधात राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे *राष्ट्रीय संयोजक मा.वामन मेश्राम साहेब यांनी तीन टप्प्यात आंदोलन घोषित केले.
आज दुस-या चरणातील आंदोलन शेकडो नागरिकांच्या साक्षीने करण्यात आले.
———————————-
३१ मे २०२६ रोजी धक्का मारो आंदोलन
३१ मे रोजी भारतातील प्रत्येक जिल्ह्यात धक्का मारो आंदोलनात हजारो नागरिक सहभागी होणार आहेत.
——————————–
जळगाव जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन…
आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष सुनिलभाऊ देहडे,बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य कोषाध्यक्ष विनोदभाऊ अडकमोल व राज्य संघटक प्रमोदभाऊ सौंदणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
जळगाव जिल्हाधिकारी मा.रोहन घुगे साहेब यांना बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकारी अनिताताई पेंढारकर,संगिताताई देहडे,शितलताई सोनवणे, दिपालीताई पेंढारकर व जयश्रीताई तायडे यांनी निवेदन दिले…निवेदन देताना चुल्ह्यावर केलेल्या भाकरी व भाजी देखील जिल्हाधिकारी साहेबांना भेट दिली.
===============
🟣जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचा जाहिर पाठिंबा…
केमिस्ट बांधवांचा आज त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा होता.केमिस्ट संघटनेचे अध्वर्यु मा.सुनिलभाऊ भंगाळे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाला भेट देऊन त्यांनी जाहीर पाठिंबा दिला…. शासनाच्या निषेधार्थ त्यांनी काळ्या टोप्या परिधान केल्या होत्या.
===============
🟣अनेक सामाजिक संघटनांचा सहभाग
केमिस्ट संघटनेचे मा.सुनिलभाऊ भंगाळे व त्यांचे सहकारी,सावरकर रिक्षा युनियनचे दिलीपभाऊ सपकाळे,बहुजन क्रांती मोर्चाचे सुमित्र अहिरे सर,कुंदन तायडे,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे खुमानसिंग बारेला,चुडामणदादा सोनवणे,प्रकाशभाऊ मालचे, आंबेडकरी विचारवंत जयसिंग वाघ साहेब,कोळी महासंघाचे गोपाळदादा कोळी,अरुण तावडे साहेब, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे डॉ.एस.एस.राणे सर,वसंत कोलते,किशोर चौधरी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे डॉ.शाकीर शेख,हाफिज दानिश, सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे हाफिज कासीम, राष्ट्रीय मुलनिवासी पेन्शनर संघाचे आर.बी.परदेशी,डी.एम.भालेराव, रविंद्र मोरे,रमेश थाटे, त्र्यंबक सोनवणे, भीमराव नन्नवरे,मराठा सेवा संघाचे शेषराव पाटील सर,भारत मुक्ती मोर्चाचे देवाभाऊ निकम,राहुलभाऊ सोनवणे, देविदास पारधे साहेब,मनोहर कोचुरे साहेब,रविदास क्रांती मोर्चाचे अविनाश वानखेडे सर,बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तवन ह्याळिंगे साहेब,मधुकर अहिरे साहेब,प्रभाकर मोरे साहेब , दिलीप तासखेडकर साहेब,असंघटित कामगार संघटनेचे भगवानदादा कांबळे, राष्ट्रीय गोरबंजारा संघाचे धनराज चव्हाण सर, रघुनाथ घोडेस्वार
तसेच शे.खलील शे.कुतोबोद्दीन,धनराजभाऊ सरदार,महेंद्र साळवे सर,एन.पी.वले साहेब,आर.के.तायडे साहेब,अशपाकभाई शेख,शे.जावेद शे.मजीद,चिरागोद्दीन शेख,अकिलभाई शेख
आदि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.



