क्राईम
जळगाव पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून ४ गावठी कट्टे,५ तलवारी दोन चॉपर एक चाकू आणि जिवंत काडतुस केले जप्त

जळगाव पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून ४ गावठी कट्टे,५ तलवारी दोन चॉपर एक चाकू आणि जिवंत काडतुस केले जप्त
जळगाव (प्रतिनिधी)- जिल्हा पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवून एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली असून मोठा शस्त्रसाठा पकडला आहे.जळगाव स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी पथक आणि एमआयडीसी पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. पोलिसांच्या कारवाईत ४ गावठी कट्टे, ५ तलवारी, दोन चोपर, १ चाकू आणि जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या कारवाईत दहा जणांना अटक केली आहे हे सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून दरोडा, खून, जबरी चोरी, प्राणघातक हल्ला याप्रमाणे भविष्यात मोठे गुन्हे घडण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना तसेच अनर्थ टळला आहे. या संशियतामध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीने कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. सोशल मीडियावर सध्या हातात शस्त्र घेऊन फोटो काढून तसेच व्हिडिओ बनवण्याची तरुणांमध्ये क्रेझ असल्याचा फायदा मिळत मात्र असं करणं हा गुन्हा असून संबंधित वृत्त करणाऱ्याला जेलची हवा खाण्याची वेळ येऊ शकते असा इशारा ही यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.



