आरोग्य

कुऱ्हाड येथील महाआरोग्य शिबिरास वैशाली सुर्यवंशी यांनी दिली भेट.!

कुऱ्हाड येथील महाआरोग्य शिबिरास वैशाली सुर्यवंशी यांनी दिली भेट…!
पाचोरा- अण्णासाहेब देशमुख फाऊंडेशन व मेडिलिव्ह मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कुऱ्हाड येथील आदर्श माध्यमिक विद्यालय येथे विना मूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरासाठी नाशिक सह धुळे, जळगाव जिल्ह्यातील तज्ज्ञ, निष्णात डॉक्टर्स आले होते.या शिबिरात रुग्णांवर मोफत तपासण्या देखील करण्यात आल्या. या महाआरोग्य शिबिरास शिवसेनेच्या नेत्या, मा.सौ वैशाली सुर्यवंशी यांनी भेट दिली.सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची सुसंवाद साधून या अनमोल सेवेसाठी शुभेच्छा दिल्यात.उपस्थित सर्व रुग्णांची चौकशी करून वेळोवेळी होणाऱ्या शिबिरात आपल्या आरोग्याची तपासणी करावी व आपली स्वतःची काळजी घ्यावी, आपले आरोग्य जपावे यासंबंधी मार्गदर्शन देखील केले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, शेतकरीसेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील.शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button