
म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसामुळे पाण्याची मोठी गळती -पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसामुळे पाण्याची मोठी गळती
जळगाव.दि.१. म्हसावद ता जळगाव येथे जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसामुळे मुळे मोठ्या प्रमाणात गळती होत आहे यांत रूग्णांना आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना कोणत्या प्रकारचा व्यवस्था व बसण्याची वेवस्ता नाही आहे कारण पावसामुळे ही इमारत पूर्णपणे गळती झाली आहे. तर छताचा भाग देखील जीर्ण झालेला असून विशेष म्हणजे या ठिकाणी मेडिकल स्टॉक रूम. कागदपत्र महत्वाचे रूम यासह अनेक ठिकाणी सर्व वस्तू साठी बॅनरने कापड व प्लास्टिक ने झाकण्यात आलेला आहे जेणेकरून हे वस्तू पाण्या त खराब होऊ नये यासाठी अनेक वेळा तक्रारी करुन सुद्धा ही समस्या अद्याप सुटलेला नाही. म्हसावद अंतर्गत आदिवासी सह 26 गावे येतात हे आरोग्य केंद्र मोठ्या गाव परिसर मोठे असल्यामुळे या परिसरात गोर गरीब , आदिवासी गरिबांची वस्ती सर्वसामन्य नागरिक रहिवाशी येथे उपचारासाठी येतात , या ठिकाणी इमारतीची छताची मोठी गळती होत असल्यामुळे रुग्णांना बसण्याची सोय किंवा एडमिट करण्याची सोय कोणत्याही प्रकारची नाही. हे आरोग्य केंद्र पूर्णपणे गवत. कचराने पूर्णपणे घेरले आहे. स्थानिक व जिल्ह्याचे जळगाव जिल्हा चे पालक मंत्री गुलाबराव पाटील
व जिल्हा परिषद सदस्य पवण सोनवणे हे या परिसरातून नेतृत्व करत आहे. यांनी या कडे लक्ष देऊन या इमारतीचे काम करण्याची मागणी या परिसरातून होत आहे . आर एच म्हसावद चे डॉ.किरण पाटील सिव्हिल सर्जन. पी एस सी आरोग्य केंद्र म्हसावद चे. डॉ तायर तडवी. डॉ निलेश अग्रवाल. तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद पांढरे. जिल्हा अधिकारी डॉ सचिन भायकर यांनी लक्ष देउन पाठपुरावा करून ह्या इमारतीचे रिपेरिंग बांधकाम करावे अशी अपेक्षा या परिसरातून होत आहे



