शिवसेना नेत्या (उभाठा गट) वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते श्रावण सोमवार निमित्त महाआरतीची आयोजन !

शिवसेना नेत्या (उभाठा गट) वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते श्रावण सोमवार निमित्त महाआरतीची आयोजन !
पाचोरा (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिव मंदिरात वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या हस्ते दि.4/9/2023 सोमवार रोजी सकाळी 10:00 वा. महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरपूर पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे ,बळीराजाला संकट मुक्त करण्यासाठी, महादेवाला साकडं घालणार आहेत. गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे,दडी मारली आहे.बळीराजा संकटात सापडलेला आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे, गुराढोरांच्या चारा प्रश्न निर्माण झाला आहे, विहिरी, तलावातील पाणीसाठा अत्यल्प झाला आहे. पुढील रब्बी हंगाम देखील धोक्यात आला आहे. माझा बळीराजा तर आभाळाकडे आस लागून रोज पावसाची वाट बघतोय. या सर्व गोष्टींचा विचार करून शिव मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी शिवभक्तांनी, शेतकऱ्यांनी, व्यापारी बांधवांनी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी, समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन उभाठा शिवसेना गटातर्फे करण्यात आले आहे.
ठिकाण:- शिव मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा.( रिक्षा स्टॉप जवळ)
दि:-4/9/2023 (सोमवार)
वेळ:- सकाळी 10:00 वा.



