आरोग्यखान्देश

पाचोरा येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व अप्पर जिल्हाधिकारी न्यायालय स्थापनेची मागणी; आमदार किशोर पाटील यांना वकिलांचे निवेदन !

पाचोरा येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व अप्पर जिल्हाधिकारी न्यायालय स्थापनेची मागणी; आमदार किशोर पाटील यांना वकिलांचे निवेदन !

पाचोरा (प्रतिनिधी):

पाचोरा येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय तसेच अप्पर जिल्हाधिकारी न्यायालय स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी पाचोरा न्यायालयातील वकील बांधवांनी आज स्थानिक आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

या वेळी आमदारांनी वकिलांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना सांगितले की, पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी या दोन्ही न्यायालयांची स्थापना होणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात आपण यापूर्वीच राज्याचे महसूल मंत्री, विधिमंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केलेली असून या मागणीचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

वकील बांधवांनी मांडलेले प्रश्न हे पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाचे प्रश्न आहेत. येत्या विधानसभेच्या अधिवेशनात तसेच सभागृहात हा मुद्दा ठामपणे मांडून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी दिले.

दरम्यान, या विषयावर पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज सायंकाळी ५ वाजता पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोर असलेल्या शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला सर्व वकील बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. अभय शरद पाटील यांनी केले आहे.

न्यूज झेप इंडिया (पाचोरा)

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button