वाशिम येथील राज्यस्तरीय अधिवेशनात किशोर रायसाकडा यांचा गौरव!

वाशिम येथील राज्यस्तरीय अधिवेशनात किशोर रायसाकडा यांचा गौरव
वाशिम, विदर्भ :
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे आयोजित राज्यस्तरीय 2026 अधिवेशनात वरिष्ठ पत्रकार किशोर रायसाकडा यांना पत्रकार क्षेत्रातील तसेच संघटनात्मक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “उत्तर महाराष्ट्र उत्कृष्ट संघटक चेतना पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे वितरण केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, रमाकांतजी व्यास (भागवताचार्य, अयोध्या मंदिर), गजानंद माऊली तसेच राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे (महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई) यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन करण्यात आले.
किशोर रायसाकडा यांनी उत्तर महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांना एकत्रित करत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. पत्रकारांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका, सामाजिक भान आणि सकारात्मक पत्रकारिता यामुळे त्यांची ओळख राज्यभर निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यामुळे पत्रकारितेला नवी दिशा आणि संघटनात्मक बळकटी मिळाल्याची भावना अधिवेशनात व्यक्त करण्यात आली.
या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, उत्तर महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
वरिष्ठ पत्रकार डॉ. योगेश आर पाटील संपादक न्यूज झेप इंडिया व सह्याद्री भूषण यांच्याकडून किशोर रायसकडा यांचे अभिनंदन व केले .



