महाराष्ट्रराजकीय

ठाकरे गटाकडून स्व.आर.ओ पाटलांचे रुग्णालयाचे फोटो सोशल मिडीयात व्हायरल करून आमदार पाटलांना घराचा आहेर ! का पाडले तोंडघशी

ठाकरे गटाकडून स्व.आर.ओ पाटलांचे रुग्णालयाचे फोटो सोशल मिडीयात व्हायरल करून आमदार पाटलांना घराचा आहेर ! का पाडले तोंडघशी ?

पाचोरा प्रतिनिधी- आज 23 एप्रिल 2023 रोजी पाचोरा शहरात सावा मैदान भडगाव रोड येथे स्व. आर. ओ. पाटलांची कन्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात  उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सभा होत आहे. सभे आधी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी मिडीयात बाईट देवून आरोप केला होता की, ठाकरे कुटुंबातील किंवा स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे आर.ओ तात्या मुंबई येथे उपचार घेत असताना उद्धव ठाकरे कुतुबातील कुणीही साधा एक फोन सुद्धा केला नाही तसेच आर.ओ तात्यांना  भेटायला वेळ देखील दिला नव्हता

तसेच ठाकरे कुटुंबातील कोणी सदस्यांनी साधी विचारपूस देखील केली नव्हती , आर.ओ तात्या पाटील यांची प्राण जोत मावळली तरी देखील  उद्धव साहेब यांना वेळ नव्हता . परंतू  आज सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो मुळे शहरासह तालुक्यात आमदार खरे कि हे फोटो खरे काय करावे या राजकारण्याचे असा प्रश्न पडला आहे . यामुळे मात्र सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे . त्या फोटो मध्ये आर ओ तात्या हे संजय राऊत यांच्या सोबत गप्पा मारत असतांना दिसत आहे.  तर आर ओ तात्यांच्या स्वर्गावासानंतरचे वैशालीताई सूर्यवंशी यांच्या सोबत घरी चर्चा करतांना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, रामदास कदमसह अन्य पदाधिकारी देखील दिसत आहेत. या फोटो मुळे आ. किशोर पाटील यांना ठाकरे गटाकडूनच नव्हे तर आपल्या बहिणीकडून घरचा आहेर देवून तोंडघशी पाडल्याचे चित्र दिसत आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button