
जामनेर रमजान ईद उत्साहात साजरी !
जामनेर (प्रतिनिधी:इमरान खान) – जामनेर प्रतिनिधी:जामनेर शहरात शनिवार २२ रोजी ईद उल-फितरची नमाज पठण करण्यात आली. सकाळी,साडे आट वाजता मौलाना इमरान यांच्या प्रमुख उपस्थितीत नमाज पठण करण्यात आली ईदगा, मैदानात ईद ची नमाजसाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आले. ईदगा मैदानात शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी होमगार्ड यांनी चोख बंदोबस ठेवला .
यावेळी.मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी इदगाह मैदानावर, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,माजी नगराध्यक्ष राजू शेठ बोरा,उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर,जितेंद्र पाटील,माजी उपनगराध्यक्ष सय्यद मुस्ताक अली, नगरसेवक अनिस शेख, सामाजिक नेते प्रफुल लोढा सेठ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलास राजपूत, खलील भांजा, काँग्रेसचे शंकर राजपुत, प्रल्हाद बोरसे, अनील बोहरा,गटनेते,डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक नाजिम शेख डॉ.इम्तियाज खान, एल,एस,खान,नुरू शेख,पत्रकार इम्रान बबलू खान,जाकीर खान,रफिक वकील,इरफान शेख,एहसान शेख,जोहब,परवेज शेख, खान,समीर खान, बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.



