
पवित्र रमजान ईद शांततेत व उत्साहात हिंदू मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईद व अक्षय तृतीयाच्या दिल्या शुभेच्छा !

पाचोरा (डॉ.योगेश पाटील ) – पाचोरा येथील आज सकाळी मानसिंगका कॉम्प्लेक्स समोर असलेली ईदगाह मस्जीद येथे पाचोरा शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून प्रार्थना केली. यावेळी हजारोच्या संख्येने वयोवृद्ध तरुण लहान बाल गोपालांनी एकत्रित होऊन सामुदायिक नमाज पठण केले व शांतते मार्गाने जाऊन मुस्लीम बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी पाचोरा शहरातील विविध
पक्षाचे राजकीय नेते पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ ,पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, पाचोरा तालुका भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, माजी नगरसेवक भूषण वाघ, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, भोला आप्पा चौधरी, बंडू चौधरी, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, किशोर बारवकर, पत्रकार बांधव या सर्वांनी मुस्लिम बांधवांचे ईद निमित्त स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या व ईद साजरी करून मुस्लीम बांधवांनी हि हिंदू बांधवांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या , 

तसेच यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवून सर्व मुस्लिम बांधवांना सुरक्षित घरी जाण्यासाठी सहकार्य केले. यावेळी सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने मुस्लीम बांधवांनी पोलीस बांधवांचे आभार मानले .



