खान्देश

मराठा सेवा संघ प्रणित वधू वर सूचक कक्ष च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी कोकिळा सुमित पाटील यांची निवड

जळगाव :- मराठा सेवा संघ प्रणित वधू वर सूचक व सामूहिक विवाह कक्ष महिला विभागाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते, पश्चिम भारतीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष. खान्देश मराठा कुणबी वधू वर परिचय ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष. गौरी उद्योग समूह वावडदा ता.जि.जळगाव चे चेअरमन सुमित जानकीराम पाटील यांच्या सौभाग्यवती शिवमती कोकिळा सुमित पाटील यांची निवड करण्यात आली आहे.मराठा कुणबी समाजातील वधू वर संबंध जुळवण्याचे उत्कृष्ठ सामाजिक कामासाठी कोकिळा सुमित पाटील या पती सुमित पाटील यांच्या समवेत मोठ्या समर्पक भावनेने सतत कार्य करीत आहेत.विनाहुंडा विवाह संबंध जोडण्यासाठी,कमी खर्चात विवाह होण्यासाठी,समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात तसेच जनजागृती करीत असतात.सामाजिक कार्यात देखील ते सतत पुढे असतात.मराठा सेवा संघ प्रणित वधू वर सूचक व सामूहिक विवाह कक्ष च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून शिवमती कोकिळा सुमित पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button