खान्देश

कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेना-भाजपाचे सर्व उमेदवार निवडून येणार -आमदार किशोर पाटील

कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेना-भाजपाचे सर्व उमेदवार निवडून येणार -आमदार किशोर पाटील

कृषी उत्पन्न बाजार समितीत कृ उमेदवार निवडून येणार

पाचोरा (प्रतिनिधी )- पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना-भाजप युती पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे १८ उमेदवार विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी माघरीच्या  शेवटच्या दिवशी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत ते बोलतांना पुढे म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीची एक इंच जागा विकली जाणार नाही व विकू देणार नाही. आमच्या पूर्वजांनी उभी केलेली संपत्ती  सुधारण्याची व त्यात वाढ करण्याची जबाबदारी आपली निश्चित आहे . रावसाहेब पाटील हे सभापती असताना त्यांच्या कार्यकाळात १२ ते १५ कोटींची कामे करण्यात आली आमच्या सत्तेपूर्वी मार्केट कमिटीचे वॉल कंपाऊंड व पत्र्याच्या शेड पलीकडे काहीच नव्हते असा खोचक टोला हि त्यांनी शिंदे परिवारास उद्देशून लावला . बोलताना ते पुढे  म्हणाले कि ,

सतीश शिंदेना लोकांनी नाकारलेले असतांना कायद्याचा व सत्तेचा गैरवापर करून त्यांनी सभापतीपद मिळविले. करोडों रुपयांचा मलिदा लाटला  तेवढेच नव्हे तर बँकेचे कर्ज भरण्याच्या नावाखाली ६० ते ६५ हजार स्केअर फुट जागेची किंमत बारा ते पंधरा कोटी रुपये असताना सव्वाचार कोटी रुपयात घेण्याचा घाट सतीश शिंदे यांनी केला. त्या प्रॉपर्टीवर स्टे आणला असून स्थगिती देण्यात आली असल्याचे सांगितले. दोन ते चार कोटी वाटून त्यांना पुन्हा सत्ता आणायची  आहे. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या प्रॉपर्टीची एक इंच विक्री होणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवाराना विजय करावे असे आवाहन सर्व मतदार बांधवांना आमदार पाटील यांनी केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी २३४ उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी तीन जागा  अवैध, दोन जणांची माधार झाली होती. २० रोजी माघारीची शेवटच्या दिवशी १६९ जणांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात आता ६० उमेदवार आहेत. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, तालुकाध्यक्ष सुनीत पाटील, हरी रावजी पाटील, भाजपाचे मधुकर काटे सदाशिव पाटील, नंदू सोमवंशी, उमेदवार जयंत पाटील, नितीन पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, नरेंद्र पाटील, संजय पाटील, मोहन पाटील, मोहन पाटील, राहुल पाटील, प्रकाश तांबे, गोविंद मोर, मनोज सिसोदिया, युसुफ पटेल, पुनम राजेंद्र पाटील सह पाचोरा, भडगाव पाटील, अर्चना पाटील, स्वीय सहाय्यक तालुक्यातील पदाधिकारी, कार्य उपस्थित होते..

newszepindia

आमच्याबद्दल :- मुख्य संपादक :- >> डॉ. योगेश आर पाटील निकम -९७६७२११००० सूचना :- खान्देशातून प्रसारित होणारे . व शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , क्राईम , कृषी , मनोरंजन इत्यादी क्षेत्राशी निगडीत न्यूज झेप इंडिया न्यूज पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही . तरीही एखाद्या बातमी बद्दल वाद निर्माण झाल्यास न्यायक्षेत्र (पाचोरा) राहील . हेल्पलाईन मेल :- newszepindia@gmail उपलब्ध :- युट्युब ,लोकल केबल , फेसबुक , इंस्टाग्राम , लोकल केबल , मोबाईल अ‍ॅप्लीकेशन ,ETC

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button